१५ किलो सोनं, १८ हजार हिरे मोती ने सजले 'रामलला' चे मनमोहक रूप.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

१५ किलो सोनं, १८ हजार हिरे मोती ने सजले 'रामलला' चे मनमोहक रूप.!

दि. 23.01.2024

MEDIA VNI 

१५ किलो सोनं, १८ हजार हिरे मोती ने सजले 'रामलला' चे मनमोहक रूप.!

मीडिया वी.एन.आय : 

उत्तर प्रदेश /अयोध्या : अयोध्येतील भव्य दिव्य मंदिरात रामलला विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली अन् देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला. काही मिनिटांतच अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं ते लोभस, सुंदर, मनमोहक आणि सात्विक भाव असलेलं रुप जगाने पाहिलं.

सोशल मीडियावर रामललाच्या मूर्तीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. जगभरातील हिंदूंनी, जगभरातील रामभक्तांनी बसल्या जागी रामललाचे दर्शन घेऊन मुखातून जय श्रीराम म्हटले. आभूषणाने सजलेली रामललाची मूर्ती डोळ्यात साठवली.

पौराणिक कथांमध्ये प्रभू श्रीरामांचे केलेल्या वर्णनानुसार आणि वस्त्र अलंकारांनी रामललाच्या मूर्तीला सजविण्यात आले होते. अध्यात्म रामायण, श्रीमद् वाल्मीकी रामायण, श्रीरामचरितमानस तथा आलवन्दार स्तोत्रांच्या अध्यायानुसार आणि त्यातील वर्णनानुसार शास्त्रसम्मत शोभूनी दिसेल, असे रामललाचे रुप साकारण्यात आले होते. मंदिरातील प्रभू श्रीरामांचे अलंकार बनवण्यासाठी १५ किलो सोनं, १८ हजार हिरे आणि पानांचा वापर करण्यात आला आहे. टीळा, मुकूट, ४ हार, कमरबंद, दोन जोड्या पैंजण, विजयीमाळ, अंगठीसह एकूण १४ अलंकार बनविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे केवळ १२ दिवसांत हे अलंकार बनविण्यात आले आहेत.

लखनौच्या हरसहायमल श्यामलाल ज्वेलर्सना हे अलंकार बनविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. विशेष म्हणजे केवळ १५ दिवसांपूर्वीच या सोनाराकडे राम मंदिर ट्रस्टने संपर्क केला होता. प्रभू श्रीराम यांच्या मुकूटमध्ये सर्वप्रथम सूर्यदेवाचे चिन्ह बनवण्यात आले आहे. कारण, राम सूर्यवंशी आहेत. राजशक्तीचे प्रतिक असलेला पत्रा मुकूटच्या मध्यभागी लावण्यात आला आहे. प्रभू राम यांच्या मुकूटला राजाऐवजी एका ५ वर्षीय बालकाच्या पगडीप्रमाणे निर्माण केले गेले आहे. मुकूटमध्ये उत्तर प्रदेशचं खास चिन्ह असलेल्या माशाचाही समावेश आहे. तर, राष्ट्रीय पक्षी मोरही दिसतो.

प्रभू रामललाचा मुकूट १ किलो ७०० ग्रॅम सोन्याने बनविण्यात आला आहे. त्यामध्ये, ७५ कॅरेट डायमंट आहेत, १७५ कॅरेट Zambian Emerald पन्ना, जवळजवळ २६२ कॅरेट रूब, माणिकंही लावण्यात आली आहेत. मुकूटमध्ये लावण्यात आलेले हिरो शेकडो वर्षांपूर्वीचे असून ते पवित्रता व सत्यतेचे प्रतिक मानले जातात. मुकूटच्या पाठीमागील भाग २२ कॅरेट सोन्याचा आहे, तो ५०० ग्रॅम वजनाचा आहे.

प्रभू श्रीराम यांच्या कपाळावरील टीळा हा १६ ग्रॅम वजनाचा आहे. याच्या मध्यभागी ३ कॅरेट हिरे आणि दोन्ही बाजूंनी १० कॅरेट हिरे बसवण्यात आले आहेत. हिऱ्याच्या मध्यभागी वापरण्यात आलेला माणिक्य Burmese रूब बर्मी माणिक्य आहे.

दरम्यान, प्रभू श्रीराम यांची बालकमूर्ती अतिशय लोभस, देखणी, सुंदर आणि मनमोहक असून वस्त्र व अलंकारांनी या मूर्तीला अधिक सात्विक सजवण्यात आलं आहे. त्यामुळे, बघताचक्षणी भाविक मूर्तीच्या प्रेमात आणि रामभक्तीत लीन होऊन जातात.

Uttar Pradesh / Ayodhya : 15 kg gold, 18 thousand diamonds and pearls adorned the charming look of 'Ramlala'.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->