दि. 17.01.2024
MEDIA VNI
Betavolt Battery : एक-दोन दिवस नाही, तब्बल 50 वर्षे टिकेल तुमच्या स्मार्टफोनचं चार्जिंग.! चिनी कंपनीने तयार केली सुपर बॅटरी.!
Betavolt Battery : China
मीडिया वी.एन.आय :
चीन : चीनमधील बीटोव्होल्ट नावाच्या कंपनीने एक मोठा शोध लावला आहे. या कंपनीने अशी बॅटरी तयार केली आहे, जी चार्ज न करताही तब्बल 50 वर्षे कार्यरत राहू शकेल. ही एक न्यूक्लिअर बॅटरी आहे, दि इंडिपेंडंटने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.
रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या बॅटरीचा आकार चक्क एका नाण्यापेक्षाही छोटा आहे. अणु उर्जेचा वापर करुन तयार करण्यात आलेली ही जगातील पहिलीच बॅटरी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही बॅटरी अणुउर्जेचं सर्वात छोटं स्वरुप आहे. (Chinese company Nuclear Battery)
स्मार्टफोन-ड्रोनसाठी वापर
कंपनीने सांगितलं, की या बॅटरीची चाचणी पूर्ण करण्यात आली असून, ही बॅटरी उत्तमरित्या कार्यरत आहे. आता स्मार्टफोन आणि ड्रोनसाठी याचा वापर करण्यात येणार आहे. अर्थात, मोठ्या स्तरावर या बॅटरीचं उत्पादन घेण्यासाठी कंपनीला कित्येक परवानग्या मिळवाव्या लागणार आहेत.
आकार
या बॅटरीचा आकार 15x15x15 मिलिमीटर एवढा आहे. सध्या ही बॅटरी 100 मायक्रोवॉट इलेक्ट्रिसिटी जनरेट करते. 2025 पर्यंत याची क्षमता वाढवून 1 वॉट करण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. या बॅटरीमधून बाहेर पडणारं रेडिएशन हे माणसांसाठी घातक नसल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
फायदा
ही बॅटरी इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात क्रांती आणू शकते. केवळ स्मार्टफोनच नाही, तर मेडिकल इक्विपमेंट्स, एआय इक्विपमेंट्स, मायक्रोप्रोसेसर, मायक्रो रोबोट अशा बऱ्याच गोष्टींना ही बॅटरी वर्षानुवर्षे कार्यरत ठेऊ शकते.
कशी करते काम?
ही बॅटरी आयसोटोपमधून बाहेर पडणाऱ्या एनर्जीचे रुपांतर वीजेमध्ये करते. विसाव्या शतकात या प्रक्रियेची संकल्पना मांडण्यात आली होती. चीनमधील या कंपनीने आता ही संकल्पना सत्यात उतरवली आहे. या बॅटरीज -60 ते 120 अंश सेल्सिअस या तापमानामध्ये देखील काम करू शकतात असा दावा कंपनीने केला आहे.
Betavolt, a Chinese tech company, has developed a groundbreaking miniature nuclear battery that can keep working for up to 50 years 🔋
— Kodefied (@kodefied) January 15, 2024
This innovation empowers phones and drones to work continuously without the need for charging or maintenance ⚡️ pic.twitter.com/MrgFvdS5z2