दि. 16.01.2024
MEDIA VNI
Maharashtra : महायुतीचा महाराष्ट्र लोकसभा जागेचा फॉर्म्युला ठरला.!
मीडिया वी.एन.आय :
दिल्ली येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागे संदर्भातील फॉर्मुला ठरल्या असल्याची माहिती समोर येत आहे. या फॉर्मुल्यानुसार सर्वाधिक जागा या भाजपाला तर सर्वात कमी जागा या अजित पवार गटाला देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र लोकसभा संदर्भात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून भाजपला 32 जागा तर शिवसेना शिंदे गटाला १० जागा, तर अजित पवार गटाला ६ जागा मिळणार आहे. एकूण 48 लोकसभा जागांचे अश्या प्रकारे वाटप झाल्या नंतर इतर महायुतीतील घटकपक्ष यांचे काय ? असा सवाल आता समोर येत आहे
महाराष्ट्राच्या महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रासप महादेव जानकर, आरपीआय रामदास आठवले, यांचा देखील समावेश महायुतीमध्ये होतो. मात्र 48 जागांपैकी 32 जागा भाजपला, 10 जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला तर अजित पवार गटाच्या 6 जागा दिल्यानंतर इतर पक्ष घटकांना लोकसभेच्या जागांमध्ये स्थान कसे मिळणार यासंदर्भात आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
Mahayuti maharashtra ews 48 Lok Sabha seats nda NDA BJP Nepotism BJP. BJP | ncp Shivsena रासप