दि. 26.01.2024
MEDIA VNI
BMC : महानगरपालिकेच्या एवढ्या प्रचंड निधीचे नेमके झाले तरी काय? राष्ट्रवादीचा सवाल.!
मीडिया वी.एन.आय :
मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक रखडली आहे. त्यामुळे प्रशासक म्हणू पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल काम त आहेत. अशातच मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये असलेल्या मुदत ठेवींमध्ये लक्षणीय घट झाल्याचे समोर आले आहे.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने एवढ्या प्रचंड निधीचे नेमके झाले तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये 2017पर्यंत 64 हजार 482 कोटी 64 लाख रुपयांच्या ठेवी होत्या. 2021-22मध्ये या ठेवी 92 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्या होत्या. त्यामुळे लवकच ही रक्कम लाख कोटींच्या घरात जाईल, असे चिन्ह होते. पण 2023च्या अखेरीपर्यंत ठेवींची रक्कम 84 हजार 615 कोटी रुपयांवर आली आहे. वर्षभराचा ताळेबंद मांडल्यास महापालिकेच्या सुमारे आठ हजार कोटी रुपयांच्या ठेवी कमी झाल्या आहेत. पालिकेच्या या मुदत ठेवींमध्ये कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन, उपदान निधी, इतर विशेष निधी, कंत्राटदार आणि इतर पक्षकारांची अनामत रक्कम यांचा समावेश आहे.
या घटलेल्या ठेवींवरून राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र तसेच राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 'ठेवी ठेऊन जनतेचा विकास होणार नाही!' असे केंद्र सरकारने मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींवर काही महिन्यांपूर्वीच वक्तव्य केले होते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई महानगरपालिका आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत महानगरपालिका मानण्यात येते. गेल्या वर्षभरात दीर्घकाळ चालणाऱ्या प्रकल्पांना लागणारा निधी मुदत ठेवींमधील राखीव निधीशी संलग्न केला असल्याने गेल्या आर्थिक वर्षात 7 हजार 756 कोटी रुपये निधी विकासकामांसाठी खर्च करण्यात आला, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
केंद्र सरकारकडे विकासकामांसाठी पुरेसा निधी असताना आज महापालिकेचा राखीव निधी खर्च का केला जात आहे? गेल्या अर्थसंकल्पात विविध राज्यस्तरीय विभागांचे निधी अर्ध्याहून अधिक कमी केलेले होते आणि आज महापालिकेचा 7 हजार कोटींचा निधी गायब झाला. या एवढ्या प्रचंड निधीचे नेमके झाले तरी काय? असा प्रश्न राष्ट्रवादीने केला आहे.
BMC: What happens to such huge funds of the Municipal Corporation? NCP's question.
‘ठेवी ठेऊन जनतेचा विकास होणार नाही!’ असे केंद्राने मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींवर काही महिन्यांपूर्वीच वक्तव्य केले होते.
— NCP (@NCPspeaks) January 25, 2024
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई महानगरपालिका आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत महानगरपालिका मानण्यात येते.
गेल्या वर्षभरात दीर्घकाळ चालणाऱ्या… pic.twitter.com/9yUS9sghNd