Maharashtra : वनरक्षक भरतीमध्ये मोठा गोंधळ; विभागाकडून पाठवलेला ईमेल चुकीचा, विद्यार्थ्यांचा दावा.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Maharashtra : वनरक्षक भरतीमध्ये मोठा गोंधळ; विभागाकडून पाठवलेला ईमेल चुकीचा, विद्यार्थ्यांचा दावा.!

दि.13.02.2024

MEDIA VNI 

Forest Guard Recruitment : वनरक्षक भरतीमध्ये मोठा गोंधळ; विभागाकडून पाठवलेला ईमेल चुकीचा, विद्यार्थ्यांचा दावा.!

Forest Guard Recruitment:

मीडिया वी.एन.आय : 

मुबंई : राज्य शासनाच्या वतीने वन विभागातील सरळ सेवा पद भरती 2023 वनरक्षक गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्या येणार आहेत. याबाबत दिनांक 8/6/ 2023 रोजी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

अशात या भरतीमध्ये पात्र उमेदवारांनी विभागाबाबत काही तक्रारी केल्या आहेत.

विभागाच्या जाहिरातीनुसार एकूण 249 पदाच्या सामाजिक आणि समांतर आरक्षणाप्रमाणे उपलब्ध होणाऱ्या पदांची भरती करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांना विभागाच्या वतीने ईमेल करून आपल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र वन विभागाच्या वतीने आलेल्या मेलमध्ये त्रूटी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

आपली कागदपत्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासून न घेता ही प्रक्रिया बंद केल्याचा आक्षेप भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. आज कोल्हापुरातील मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालय इथं महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या कागदपत्रांची छाननीची वेळ निघून गेल्याचे कारण देत त्यांची कागदपत्रे घेण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. यावेळी या सर्व विद्यार्थ्यांनी वन विभागाच्या वतीने पाठवलेला ईमेल चुकीचा असून यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन भरतीवर परिणाम होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा असाच गोंधळ झाला होता. मात्र त्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य करत त्यांची कागदपत्रे तपासून घेतलेली आहेत. तोच निकष लावत कोल्हापूर विभागात आलेल्या विद्यार्थ्यांच्याही कागदपत्रांची छाननी व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे.


Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->