दि. 15.02.2024
MEDIA VNI
खोदकाम करताना दगडाखाली सापडली वस्तू; पाण्याने धुताच बसला आश्चर्याचा धक्का.! बघा व्हिडीओ..
मीडिया वी.एन.आय :
मुबंई : दडलेल्या खजिन्याबद्दल तुम्ही गोष्टींमध्ये अनेकदा ऐकलंच असेल. असा खजिना प्रत्येकाला सापडत नाही ही वेगळी गोष्ट आहे. पण काही ठिकाणं अशी आहेत की, जिथे खोदल्यावर काहीतरी मौल्यवान वस्तू सापडते.
सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक एक दगड फोडून तो बाजूला करत असल्याचं दिसतं. ते जमीन खोदण्यात व्यस्त होते. दरम्यान, त्यांना चिखलात काहीतरी सापडलं. तुम्हीही हा व्हिडिओ पाहिल्यास तुम्ही म्हणाल, की आम्हालाही असा खजिना मिळाला असता तर बरं झालं असतं.
🔷
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही लोक दगड फोडताना दिसत आहेत. ते आधी खडकाचे तुकडे करतात आणि नंतर खाली खोदण्यास सुरवात करतात. दगडाखाली चिखल आहे आणि तिथून त्यांना चिखलात भिजलेले काही तुकडे सापडतात. जेव्हा हे लोक हे तुकडे प्लास्टिकच्या चाळणीत ठेवतात आणि धुतात. तेव्हा त्यातून चमकदार धातू बाहेर पडतात. हा चमकदार धातू सोनं आहे, ज्यापासून मौल्यवान दागिने बनवले जातात.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर fishngold नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 1.6 कोटींहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर लाखो लोकांनी लाइकही केला आहे. यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी म्हटलं आहे, की थोड्या पैशासाठी लोक निसर्गाचा ऱ्हास करत आहेत.