राष्ट्रवादीची सूत्रे हातात येताच अजित पवारांची सुप्रीम कोर्टात धाव.. नेमकं कारण काय ? वाचा सविस्तर.. - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

राष्ट्रवादीची सूत्रे हातात येताच अजित पवारांची सुप्रीम कोर्टात धाव.. नेमकं कारण काय ? वाचा सविस्तर..

दि. 07 फेब्रुवारी 2024 

MEDIA VNI 

राष्ट्रवादीची सूत्रे हातात येताच अजित पवारांची सुप्रीम कोर्टात धाव.. नेमकं कारण काय ? वाचा सविस्तर..

Maharashtra Politics :

मीडिया वी.एन.आय : 

मुबंई : काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार यांना दिल. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडीत मोठा वेग आला आहे.

अजित पवार यांच्या वतीने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्यावतीने अधिवक्ता अभिकल्प प्रताप सिंह यांनी याचिका दाखल केली आहे. दुसऱ्या गटाने (शरद पवार गट) सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली तर अजित पवार गटाच्या विरोधात कोणताही एकतर्फी आदेश निघणार नाही यासाठी हे करण्यात आले आहे.

६ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारमधील अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून घोषित केले. आयोगाने राष्ट्रवादीला पक्षाचे नाव आणि घड्याळ हे अजित पवार गटाला निवडणूक चिन्ह दिले. ६ महिने चाललेल्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला. बहुसंख्य आमदारांनी अजित गटाला राष्ट्रवादीचे नाव आणि निवडणूक चिन्ह मिळवून देण्यासाठी मदत केल्याचे आयोगाने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने काय म्हटले?
अजित पवाराकंडील पक्ष खरा पक्ष आहे
पक्ष आणि चिन्ह अजित पवार वापरतील
दोन खासदार अजित पवार गटाच्या बाजूने
५ आमदारांनी दोन्ही बाजूंनी पत्र दिले
उद्या ७ फेब्रुवारीपर्यंत पक्षाचे नाव आणि चिन्ह सूचवावे
पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नाहीत

Ajit Pawar's run to the Supreme Court as soon as the sources of NCP came in hand.. What is the real reason? Read in detail..

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->