दि. 21.02.2024
MEDIA VNIModi Government/EVM : 'मोदी सरकार को हटाओ, भारत सरकार को बचाओ' EVM हटाओ देश बचाओ, कुणी लावले बॅनर.?
मीडिया वी.एन.आय :
प्रतिनिधी/गडचिरोली : विकसित भारत संकल्प यात्रेत 'मोदी सरकार'चा उल्लेख करण्यात आल्याने अनेक गावांत यात्रांना परतवून लावण्याच्या घटना घडल्या. कुठल्याही शासकीय कामात 'भारत सरकार' ऐवजी 'मोदी सरकार', असा उल्लेख वारंवार करण्यात येत असल्याने आता याबाबतची चीड निर्माण झाली आहे.
गडचिरोली या अतिदुर्गम, नक्षलग्रस्त जिल्ह्यातील अनखोडा या गावातील एका तरुणाने आपल्या दुकानासमोर ''मोदी सरकार काे हटाओ'', ''भारत सरकार को बचाओ'' असे बॅनर लावले आहेत. केंद्र शासनाची कुठलीही योजना करदात्यांच्या पैशाने राबविण्यात येते. त्यामुळे या योजना जनसामान्यांपर्यंत जेव्हा येतात, तेव्हा त्या भारत सरकारच्या योजना अशा अर्थाने येणे अपेक्षित असते.
केंद्र सरकार मोदी सरकारच्या नावाने या संपूर्ण योजना गावखेड्यांपर्यत पोहाेचवत आहे. वारंवार मोदी सरकारची हमी असे संबोधित केले जाते. अशात हमी भारत सरकार देते की मोदी सरकार, हा प्रश्न समोर येत आहे. अशाच संतापातून गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील अनखोडा या गावातील एका तरुणाने आपल्या छोट्याशा दुकानासमोर आता मोदी सरकार हटाओ, भारत सरकार बचाओ, असे बॅनर लावले आहेत.
संतोष तिमाडे असे बॅनर लावणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो अनखोडा या लहानशा गावात किराणा दुकान चालवतो. आपण कुठल्याच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नसून देशात जे काही सुरू आहे, ते निंदनीय असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे. आपल्या सर्वांकरिता भारत सरकार असे अपेक्षित असताना वारंवार मोदी सरकार म्हणून विविध बाबी समोर आणल्या जात आहेत. यातून शासनाला नेमका कोणता संदेश द्यायचा आहे, असा सवाल संतोष तिमाडे यांनी उपस्थित केला आहे.
आपल्या दुकानाच्या एका बाजूला त्यांनी ''मोदी सरकार हो हटाओ'', ''भारत सरकार को बचाओ''असा तर दुसऱ्या बाजूला ईव्हीएम हटाओ देश बचाओ, असे बॅनर लावीत संताप व्यक्त केला आहे. आपण कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून सामान्य नागरिक आहे. मी स्वतः हे बॅनर लावले असून, जर माझ्यावर कुणाला कार्यवाही करायची असेल तर खुशालपणे करू शकता, असे तिमाडे यांनी सांगितले आहे.
आम्हाला भारत सरकार पाहिजे आहे. मोदी सरकार नव्हे. वारंवार मोदी सरकार, मोदी सरकार असे सांगून आम्हाला मूर्ख बनविण्याचे काम देशात सुरू असल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. भारत सरकारऐवजी मोदी सरकारचा उल्लेख केल्याने शासकीय यंत्रणांना गावागावांतून हाकलून लावण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता तर वैयक्तिकरीत्या याचा विरोध होऊ लागला आहे. आज समोर आलेल्या अनखोडा येथील घटनेवरून याचा प्रत्यय आला आहे.
Modi Government/EVM : 'Remove the Modi government, save the government of India' Remove the EVM, save the country, who put up the banner?
#brekingnews #latestnews