राष्ट्रीय महामार्ग 'NH 353 सी'च्या बांधकामात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

राष्ट्रीय महामार्ग 'NH 353 सी'च्या बांधकामात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार.!

दि. 10 मार्च 2024
MEDIA VNI 
राष्ट्रीय महामार्ग '३५३ सी'च्या बांधकामात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार.!
- बांधकामातील अनियमिततेवर विविध संघटनांचा आक्षेप.!
मीडिया वी.एन.आय : 
प्रतिनिधी/गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग "प्राधिकरणाच्या नागपूर येथील वरिष्ठ "अधिकाऱ्यांना लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर खळबळ उडाली होती. याच विभागांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग '३५३ सी' च्या बांधकामातील अनियमिततेवर काही संघटनांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात पोलीस बॉईज असोसिएशन आणि केंद्रीय मानवाधिकार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल - केली असून चौकशीची मागणी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामातील भ्रष्टाचारासंदर्भात नागरिकांकडून कायम ओरड असते. परंतु काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई होत नाही. आता जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी मधील गडचिरोली ते चामोर्शी दरम्यानच्या बांधकामात अनियमितता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या बांधकामाचे एकूण मूल्य ३९६ कोटी इतके होते. त्यापैकी २०९ कोटी मंजूर करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू असून यातील केवळ काही पुलाचे बांधकाम शिल्लक आहे. परंतु, बांधकामाच्या अवघ्या काही महिन्यातच मार्गावर मोठ मोठ्या भेगा पडल्या अनेक ठिकाणी रस्ता खचून असमतोल स्थिती निर्माण झाली. सोबतच बांधकाम करताना नियमांना डावलण्यात आले. त्यामुळे या मार्गावर कायम अपघात होत असतात. आत्तापर्यंत झालेल्या अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले आहे.
महामर्गाच्याबाबतीत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील एका तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्याने कंत्राटदारासोबत संगनमत करून कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. याविषयी तक्रार केल्यानंतर सिमेंट रस्त्यावर डांबर टाकून दुरुस्ती करण्यांत आली. परंतु, कंत्राटदारावर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी व कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
🔷 उच्च न्यायालयात दाद मागणार...
गडचिरोली जिल्ह्यात अनेक विकास कामे सुरू असून अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने शेकडो कोटींचा भ्रष्टाचार होतो आहे. तक्रार केल्यास प्रशासन कारवाई करण्यास तयार नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नागपूर वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाचप्रकरणी नुकतीच अटक झाली. त्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतील तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांची चौकशी झाल्यास अनेक घोटाळे बाहेर येतील. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक '३५३ सी'च्या बांधकामात देखील शकडो कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. याची उच्चस्तरिय चौकशी न झाल्यास लवकरच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा पोलीस बॉईज असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश कोरामी, उपाध्यक्ष आकाश ढाली व विपुल खोब्रागडे यांनी दिला आहे.
Gadchiroli : Corruption of hundreds of crores in the construction of National Highway '353 C.!
- Various organizations objected to irregularities in construction.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->