दि. 09.04.2024
MEDIA VNI
महाविकास आघाडीचा सर्व 48 जागांचा फार्मूला जाहीर.!
Maha Vikas Aghadi Joint Press Conference : Formula of all 48 seats of Mahavikas Aghadi announced!
मीडिया वी.एन.आय :
मुंबई : आज मुंबईत महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून शिवसेना ठाकरे गट 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार आहे. कित्येक दिवसांपासूनचा महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. तर, सांगली आणि भिवंडीच्या जागांचाही तिढा सुटला आहे.
महाविकास आघाडी जागावाटपाचा फॉर्म्युला
- काँग्रेस (Congress) : 17 जागा
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) : 10 जागा
- शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Group) : 21 जागा
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम फार्मुला जाहीर करण्यात आला. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांसह उर्वरित जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवेल याचीही माहिती या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. सांगलीची जागा ठाकरे गट लढवणार असून भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे देण्यात आली आहे. तर मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी दोन जागा काँग्रेस लढवणार असून उर्वरित चार जागा ठाकरे गटाला सुटल्या आहेत.
काँग्रेसच्या 17 जागा कोणत्या?
- नंदूरबार
- धुळे
- भंडारा-गोंदिया
- गडचिरोली-चिमूर
- जालना
- मुंबई उत्तर मध्य
- उत्तर मुंबई
- रामटेक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 जागा कोणत्या?
- बारामती
- शिरुर
- भिवंडी
- दिंडोरी
- माढा
- रावेर
- अहमदनगर दक्षिण
शिवसेना ठाकरे गटाच्या 21 जागा कोणत्या?
- दक्षिण मुंबई
- दक्षिण मध्य मुंबई
- उत्तर पश्चिम मुंबई (North West)
- मुंबई ईशान्य
- पालघर
- कल्याण
- मावळ
- धाराशीव
- हातकणांगले
- शिर्डी
- सांगली
- हिंगोली
- यवतमाळ- वाशिम
संजय राऊतांचा नाना पटोलेंना मिश्किल टोला
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाल्यानंतर संजय राऊत यांनी मविआमधील सर्व प्रमुख नेत्यांचा परिचय करुन दिला. संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले की, आजच्या गुढी पाडवाच्या शुभ मुहूर्तावर महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद होत आहेत. अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत. आजचं वातावरण प्रसन्न आहे, असं म्हणत असताना राऊतांनी नाना पटोलेंना मिश्किल टोलाही लगावला. नाना पटोले मान हलवताय. काँग्रेस नेत्यांचे आनंदी चेहरे पाहतायत. पवार साहेबांचा प्रसन्न चेहरा बघतोय. शिवालयाच्या या वास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो, असं संजय राऊत म्हणाले.
आता मतभेद नाहीत, वाचलेल्या जागाच फायनल : शरद पवार
संजय राऊतांनी महाविकास आघाडीचा अंतिम जागावाटप जाहीर केला. तिन्ही घटक पक्षांच्या याद्या संजय राऊतांनी वाचून दाखवल्या. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर शरद पवारांनी आता कोणत्याही जागेवर मतभेद राहणार नाही, आता वाचलेल्याच जागा फायनल असतील, असं शरद पवार म्हणाले आहेत.