EVM ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद, शरद पवार गटाकडून तक्रार दाखल.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

EVM ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद, शरद पवार गटाकडून तक्रार दाखल.!

दि. 13.05.2024 

MEDIA VNI 

EVM ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद, शरद पवार गटाकडून तक्रार दाखल.!

मीडिया वी.एन.आय :  

बारामती : लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान पार पडले. दरम्यान मतदान झाल्यानंतर मतदारसंघात ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे आज सकाळपासून बंद पडल्याचा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने केला आहे. 

तसेच त्यांनी याबाबतची तक्रारही दाखल केली आहे.

सुप्रिया सुळे यांचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगा तक्रार केली होती. तक्रारीनंतर तब्बल 45 मिनिटे बंद झालेले सीसीटीव्ही पुन्हा सुरू झाले आहेत.

दरम्यान बारामती मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान झाले होते. तर याची मतमोजणी 4 जूनला होणार आहे. तोपर्यंत या ईव्हीएम मशिन्स बारामतीतील विधानसभा मतदारसंघ गोदामात म्हणजेच स्ट्रॉगरूममध्ये ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान आज सकाळी राष्ट्रवादीचे (शरद पवार) लक्ष्मीकांत खाबिया यांना ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी काहीतरी काळंबेरं होण्याची शक्यता वर्तवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत आयोगाकडून हे कॅमेरे सुरू करण्यात आले.

यावेळी 'साम टीव्ही'शी बोलताना सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले, "बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशिन्स ज्या गोदामात ठेवलेले आहे त्या गोदामाचे सीसीटीव्ही सकाळी 10:25 पासून 45 मिनिटांपासून बंद आहेत. त्यामुळे यामध्ये काही काळं बेरं तर नाही ना याची शंका येत आहे.

ते पुढे म्हणाले, "आम्ही आधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधत आहोत. बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करण्यासाठी टेक्निशियन्स उपलब्ध नाहीत. गोदामाबाहेर असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना गोदामात काय चाललेय हे पाहू देत नाहीत. पोलीस म्हणत आहेत, आम्हाला काही आदेश नाहीत. त्यामुळे येथे काय चाललेय कळेना झाले आहे."


Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->