पोलिस अधीक्षक कार्यालयात पार पडला महाराष्ट्र दिन.! - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

पोलिस अधीक्षक कार्यालयात पार पडला महाराष्ट्र दिन.!

दि. 01.05.2024
MEDIA VNI 
पोलिस अधीक्षक कार्यालयात पार पडला 
महाराष्ट्र दिन.!
पोलिस अधीक्षक यांचे हस्ते करण्यात आले ध्वजारोहण.!
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : दिनांक 01 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तेव्हापासून 01 मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. आज पोलिस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे मा. पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम ठिक 06.45 वा. पार पडला.  
यावेळी सर्वप्रथम पोलिस अधीक्षक कार्यालयातील प्रांगणात शहिद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन सर्व शहिद बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दिनांक 01 मे 2019 रोजी मौजा जांभुळखेडा ते कुरखेडा मार्गावर माओवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात शहिद वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सन – 2023 या वर्षात उल्लेखनिय कामगिरी बजावल्या बद्दल गडचिरोली पोलीस दलातील 130 अधिकारी/अंमलदार यांना मा. पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहिर झाले आहे. सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. तसेच उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन स्टाफ व शहिद कुटुंबीयांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व उपस्थित शहिद कुटुंबीयांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यासोबतच पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे मा. जिल्हाधिकारी संजय दैने यांचे हस्ते 08.00 वा. ध्वजारोहनाचा कार्यक्रम संपन्न झाला, या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस दलाकडुन पथसंचलन सादर करण्यात आले. 
यावेळी कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा सुहास शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सुरज जगताप हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जनसंपर्क कार्यालयाचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Share News

copylock

Post Top Advertisement

-->