दि. 16.05.2024
आयकर विभागाची मोठी कारवाई, तब्बल 170 कोटी रुपये केले जप्त.!
170 crore money found in Nanded :
मीडिया वी.एन.आय :
नांदेड : नांदेड शहरात आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. शहरातील भंडारी फायनान्स आणि आदिनाथ सहकारी बँकेवर आयटी पथकाने छापा टाकला. या छाप्यात कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता सापडली असून, ती प्राप्तीकर विभागाने जप्त केली आहे.
ही कारवाई तब्बल 72 तास सुरू होती.
या कारवाईदरम्यान सापडलेली ही रोकड इतक्या मोठ्या प्रमाणात होती की ज्यांची मोजणी करण्यासाठी 1-2 नव्हे तब्बल 14 तास लागले. या छाप्यात विभागाला भंडारी कुटुंबाची 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. एवढंच नव्हे तर 8 किलो सोनेही सापडले.
भंडारी कुटुंबातील वियन भंडारी, संजय भंडारी, आशिष भंडारी, संतोष भंडारी, महावीर भंडारी आणि पदम भंडारी यांचा नांदेडमध्ये खासगी फायनान्सचा मोठा व्यवसाय आहे. मात्र, येथे करचुकवेगिरी झाल्याची तक्रार आयकर विभागाकडे आली होती. त्यामुळे पुणे, नाशिक, नागपूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या सहा जिल्ह्यांतील आयकर विभागाच्या शेकडो अधिकाऱ्यांनी संयुक्त छापेमारी केली.
यात सुमारे 100 अधिकाऱ्यांचे पथक 25 वाहनांतून नांदेडला पोहोचले होते. या पथकाने अलीभाई टॉवर येथील भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यालय, कोठारी कॉम्प्लेक्समधील कार्यालय, कोकाटे कॉम्प्लेक्समधील तीन कार्यालये आणि आदिनाथ अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेवर छापे टाकले. याशिवाय पारसनगर, महावीर सोसायटी, फरांदे नगर, काबरा नगर येथील घरांवरही छापे टाकण्यात आले.
Big operation of income tax department, as much as 170 crore rupees seized.!