जल जीवन मिशन चा जलकुंभ कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली .! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

जल जीवन मिशन चा जलकुंभ कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली .!

दि. 15 जून 2024 
MEDIA VNI 
जल जीवन मिशन चा जलकुंभ कोसळला;
रात्रीची घटना सुदैवाने जीवितहानी टळली.!
चिचारी जल जीवन मिशन चा जलकुंभ कोसळला रात्रीची घटना सुदैवाने जीवीत हानी नाही.!
जि. प ग्रामिण पुरवठा विभागाचे काम
अधिकारी घटना स्थळावर फिरकलेच नाही.!
मीडिया वी.एन.आय : 
प्रतिनिधी : बुलढाणा/संग्रामपूर : (Jal Jeevan Mission) : राजकारणी अन् अधिकारी यांच्या अभद्र युतीमुळे सातपुड्यात कंत्राटदाराने विकासाचा जन्मा आधीच गळा घोटला आहे. परिणामी आदिवासी गाव चिचारी ता. संग्रामपूर येथे जल जीवन मिशनचा जलकुंभ कोसळल्याची घटना १२ जून च्या रात्री १० वाजेच्या सुमारास उधडकीस आली. या टाकीचे ९० टक्के काम पूर्ण झाले होते. (Zilla Parishad) जिल्हा परिषद ग्रामिण (Supply Department) पाणी पुरवठा विभागाकडून जावेद अहेमद सलीम शेख नावाच्या कंत्राटदारांना कडून काम सुरू असल्याचे खामगाव चे उपकार्यकारी अभियंता थोरात यांनी सांगितले.
जि. प ग्रामिण पुरवठा विभागाचे काम
हे काम १ कोटी ७५ लक्ष रुपयाचे आहे. अत्यंत निकृष्ठ दर्जाचे काम झाल्यामुळे जलकुंभाचे कॉलम जमिनदोस्त झाले त्यावरचा जलकुंभ जमिनीवर कोसळला आहे. चिचारी गावात जलकुंभ कोसळतांना प्रचंड आवाज झाला. यामुळे भयभित गावकरी घराबाहेर आले. त्या वेळी (Jal Jeevan Mission) जलकुंभ कोसळल्याचे दिसून आले.
अधिकारी घटना स्थळावर फिरकलेच नाही
रात्रीची ही खळबजनक घटना असतांना (Zilla Parishad) जिल्हा परिषदेचे अधिकारी घटनास्थळी फिरकलेच नाहीत. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. चोर चोर मावसेरे भाई एकत्र आल्याने या कामात मोठा गडबड घोटाळा झाला आहे. या बाबत आदिवासी रोष व्यक्त करित आहेत. कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->