दि. 30 जून 2024
शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! कृषी पंपाचं थकीत वीज बिल माफ, राज्यातील किती शेतकऱ्यांना होणार फायदा?
Maharashtra Budget 2024 :
मीडिया वी.एन.आय :
मुबंई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी दि. 28 जूनला विधानसभेत अर्थसंकल्प (Budget) सादर केला. यामध्ये त्यांनी विविध योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी (Farmers), महिलांसाठी विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये एक महत्वाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे थकीत वीज बील माफ (waive electricity bill) करण्याचा निर्णय सरकारनं घेतलं आहे.
राज्यातील 44 लाखाहून अधिक कृषी पंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार
महाराष्ट्र विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला 27 जुनपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामधील महत्वाची घोषणा म्हणजे सरकारनं शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा राज्यातील 44 लाखाहून अधिक कृषी पंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
सरकार शेतकऱ्यांना देणार मोफत वीज
अर्थसंकल्पात (Budget) आज अजित पवार यांनी विविध योजनांची घोषणा केली आहे. यामधील महत्वाची घोषणा म्हणजे आता शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. यासाठी सरकार मागेल त्याला सौरऊर्जा पंप देणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. या योजनेमुळं राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं बोललं जात आहे. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौरऊर्जा करून करण्याचा 15000 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी, यासाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना मोफत वीज व्हावी यासाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप देण्यात येईल अशी घोषणा अजित पवार यांनी केली.
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य
राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर असल्याचे सांगत ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू केली आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयांत पिक विमा देण्याची योजना कायम असणार आहे. तर, गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येत आहे. जुन्या गोदामांची डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीहेक्टर 5 हजार रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे.
Maharashtra : Big announcement for farmers! How many farmers of the state will benefit from the overdue electricity bill waiver of agricultural pumps?
#MediaVNI #Maharashtra #agricultural #electricity