महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती कुणाला? पहिल्या क्रमांकावर कोण.? बघा.. - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती कुणाला? पहिल्या क्रमांकावर कोण.? बघा..

दि. 13 जुलै 2024 
MEDIA VNI 
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती कुणाला? पहिल्या क्रमांकावर कोण.? बघा..
मीडिया वी.एन.आय : 
मुबंई : लोकसभा निवडणुकीच्या धुराळ्यानंतर आता राज्यामध्ये विधानसभेचं बिगुल वाजताना दिसतंय. विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपलेली आहे. लोकसभेच्या धक्कादायक निकालानंतर आता सर्वांच्या नजरा विधानसभेकडे लागल्या आहेत.
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती कुणाला? असा प्रश्न आता सर्वांनाच पडत आहे, याचा खुलासा आता सर्वेक्षणात झालाय.

भावी मुख्यमंत्री कोण असावा?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेची भावी मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती कुणाला? असा प्रश्न सकाळ- सामच्या सर्वेक्षणात मतदारांना विचारण्यात आला होता. त्यावर मतदारांनी काय म्हटलंय, ते पाहू या. जनतेने सर्वेक्षणात भावी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचं तिसऱ्या क्रमांकाची पसंती दिलीय. तर पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकांची आकडेवारी सारखी आहे. मतदारांनी आपली पसंती देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना दिलीय. राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण असावा? यासाठी मतदारांनी सर्वपक्षीय नेत्यांमधून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना सारखीच पसंती दिल्याचं सर्वेक्षणातून समोर आलंय. या दोघानांही २२.४ टक्के मतदारांचा कौल मिळालेला आहे. तर एकनाथ शिंदे यांना १४.५ टक्के मतदारांनी पसंती दिलीय. मात्र १०.२ टक्के मतदारांनी सांगता येत नसल्याचं सर्वेक्षणात नमूद (Vidhan Sabha Election 2024) केलंय.

मतदारांचा कौल कुणाला?

लोकसभेत महाविकास आघाडीच्या बाजुने जनतेचा कौल पाहायला मिळाला. तो विधानसभा निवडणुकीत देखील मविआच्या बाजूनेच झुकलेला दिसतोय. तर राज्यातील सर्वात बलशाली पक्ष म्हणून जनतेने भारतीय पक्षाला पसंती देत (Maharashtra Politics) आहेत. महाविकास आघाडीच्या बाजूने ४८.७ टक्के मतदारंचा कल आहे, तर भाजकडे २८. ५ टक्के मतदारांचा कल आहे. महाविकास आघाडीला कौल देणार मतदार मविआचा सर्वात जास्त लाभ कॉंग्रेसला तर महायुतीला कौल देणारे मतदार महायुतीचा सर्वाधिक लाभ शिंदे गटाला झाल्याचं नोंदवत आहेत.

विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष

आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीत मराठा आणि ओबीसी आरक्षण हे मुद्दे महत्वाचे आहेत. त्यावरून मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तर नुकतंच महायुतीसरकारने लाडकी बहिण योजनेची घोषणा (Vidhan Sabha Election) केलीय. या सगळ्याकडे मतदार कसे बघतात हे सकाळने केलेल्या सर्वेक्षणावरून समोर आलंय. तर मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांसह भाजपमधून इतर कोण? यावर मतदारांनी नितीन गडकरींना पसंती दिली आहे. त्यामुळे आता मतदारांचा मोठा कल महाविकास आघाडीकडे असल्याचं माध्यम समूहाच्या सर्वेक्षणातून दिसतंय.
Who is most preferred as the future Chief Minister of Maharashtra? Who is number one? Look..

#cmo #ChiefMinister  #Maharashtra #political #CM #politics #marathinews 
#mukhymantriladkibahanyojna 


Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->