लाडकी बहिण, लाडका भाऊ नंतर आता राज्य सरकारची 'ही' नवीन योजना; मिळणार 'इतकी' रक्कम.! बघा.. - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

लाडकी बहिण, लाडका भाऊ नंतर आता राज्य सरकारची 'ही' नवीन योजना; मिळणार 'इतकी' रक्कम.! बघा..

दि. 25 जुलै 2024 
MEDIA VNI 
लाडकी बहिण, लाडका भाऊ नंतर आता राज्य सरकारची 'ही' नवीन योजना; मिळणार 'इतकी' रक्कम.! बघा.. 
मीडिया वी.एन.आय :  
मुबंई :
राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. याद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर करण्यात आली. 
याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे. 
दरम्यान दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला आणि बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे 40 ते 80 टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी 'धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य' योजनेतंर्गत एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येत आहे. 

सन 2024-25 ते सन 2028-29 या पाच वर्षांच्या कालावधीकरिता या योजने अंतर्गत दरमहा एक ते तीन हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे. 

60 हजार दिव्यांगांना लाभ 

पुढील पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत सुमारे 60 हजार दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी दरवर्षी 111.83 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका कार्य क्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे. 

पालिका क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवासी असलेल्या दृष्टी नसलेले, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मनोविकलांग आणि इतर प्रकारचे शारीरिक व्यंगत्व आलेल्या दिव्यांग व्यक्तींना सामान्य जीवन जगता यावे, योग्य औषधोपचार व आहार घेता यावा आणि व्यंगत्वामुळे अर्थार्जन आणि जीवनमान सुधारणांची संधी गमावल्यामुळे आलेले परालंबित्व कमी व्हावे, यासाठी 'धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना' सुरू करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 

कोणत्या दिव्यांग बांधवांना मिळणार योजनेचा लाभ?

या योजने अंतर्गत वय वर्ष 18 वरील 40 टक्के दिव्यंगत्व आलेल्या व्यक्तींना दरमहा एक हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित सहा हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल. म्हणजेच वार्षिक १२ हजार रुपये मिळतील. तसेच 80 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा तीन हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित 18 हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल. म्हणजेच वार्षिक 36 हजार रुपये मिळतील. या दोन्ही गटातील दिव्यांगांना पुढील पाच वर्षांकरिता हा लाभ मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. 

कसा करा अर्ज ? 

या योजने अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवाशी असलेल्या दिव्यांगांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसाठी पात्रतेचे निकष, योजनेच्या अर्टी, शर्ती, आवश्यक कागदपत्रे व अर्जाचा नमुना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

यासाठी संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in येथे About BMC - Departments - Department Manuals-Assistant Commissioner Planning-Docs- दिव्यांग व्यक्तींसाठी 'धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना (सन 2024-25 ते सन 2028-29)' यावर क्लिक केल्यास तेथे अर्जाचा नमुना उपलब्ध होईल. 

सदर योजनेचे अर्ज भरण्यास अंतिम मुदत नाही. सर्व कागदपत्रांसहित पूर्ण भरलेले अर्ज सर्व संबंधित विभाग कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत जमा करावेत, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.
After Beloved Sister, Beloved Brother Now State Govt's 'This' New Scheme; You will get 'so much' amount.! Look..
#MaharashtraNews #maharashtra #GovernmentScheme #marathinews 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->