दि. 20 जुलै 2024
अतिवृष्टीदरम्यान शाळा प्रशासनाने सुट्टीचा निर्णय घ्यावा : जिल्हाधिकारी संजय दैनेमीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी बाबत हवामान विभागाने दिलेला इशारा व कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्या देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता ज्या ठिकाणी शाळेच्या मार्गात नदी, नाले, पूल रपटा च्या पाण्यामुळे अडथळा निर्माण होत असेल तेथे सर्व व्यवस्थापनाच्या शाळा व महाविद्यालयातील मुख्याध्यापकांनी स्वतः निर्णय घेऊन आवश्यकतेनुसार सोमवारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिले आहेत.
Gadchiroli : School administration should decide on holiday during heavy rains: Collector Sanjay Daine #गडचिरोली
#gadchiroli #Maharashtra #rainfall #monsoon #HeavyRain #marathinews