दि. 19 जुलै 2024
चंद्रपूर : MBBS एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने नदीत उडी घेत केली आत्महत्या.! #Chandrapur
मीडिया वी.एन.आय :
प्रतिनिधी/चंद्रपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातून एक बातमी समोर येत आहे, एमबीबीएसची पदवी घेतलेल्या उच्चशिक्षित तरुणीने नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. मुलीने पुलावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पहिल्यांदाच उडी मारताना ती वाचली नंतर तिने पुन्हा जीव देण्यासाठी पाण्यात उडी घेतली आणि आपले आयुष्य संपविले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. मुलीने आत्महत्या का केली अद्याप समजू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय ईशा घनश्याम बिंजवे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरातील रहिवासी आहे. ईशाचे आई-वडील दोघेही होमिओपॅथी डॉक्टर असून ब्रम्हपुरी शहरात त्यांचे क्लिनिक आहे. चंद्रपूर-गडचिरोली सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत ईशाने उडी मारून आत्महत्या केली.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की मुलीने पहिल्यांदा पाण्यात उडी घेतल्यावर ती कमी पाणी असल्यामुळे वाचली. पुन्हा तिने जीव देण्याचा निर्णय घेत. खोल पाण्यात उडी घेतली. आणि आत्महत्या केली.
तरुणीने आपली स्कूटर आणि चप्प्प्ल पुलावर सोडली आणि पाण्यात उडी घेतली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी शोधमोहीम राबवून दुसऱ्या दिवशी पिंपळगाव जवळील नदी पात्रातून मृतदेह बाहेर काढला.
उच्चशिक्षित तरुणीने आत्महत्या का केली? याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Chandrapur: MBBS MBBS student committed suicide by jumping into the river. #bramhapuri #maharashtra