दि. 16 जुलै 2024
गडचिरोली जिल्ह्यात 84 जिल्हा परिषद शाळा शिक्षकाविना ; शिक्षण विभागाचे दुर्लक्ष.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : राज्यातील जिल्हा परिषद शाळांची बिकट अवस्था झालेली आहे. या शाळांना अगोदरच विद्यार्थी मिळत नसल्याने शाळा सुरु ठेवण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. तर दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ८४ जिल्हा परिषद शाळा शिक्षकाविना असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.यामुळे विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे.
गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक नसल्याने पालक विद्यार्थ्यांनी अनेकदा आंदोलन केली आहेत. शिक्षक मिळावे या मागणीसाठी अनेकदा गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकत आंदोलन केले आहे. मात्र शासनाकडून रिक्त पदे भरली जात नसल्यामुळे जिल्ह्यातील देसाईगंज तालुका वगळता इतर ११ तालुक्यातील तब्बल ८४ शाळा शिक्षकाविना आहेत. याबाबत (Zp School) जिल्हा परिषद प्रशासन देखील उदासीन असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
दरम्यान गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून (Education department) अद्याप समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. शैक्षणिक सत्र सुरू होऊन देखील या शाळा शिक्षकाविना आहेत. गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, भामरागड तालुक्यातील प्रत्येकी एक तर कोरची १०, धानोरा, मुलचेरा दोन, चामोर्शी ५ एटापली ३५, अहेरी ७ आणि सिरोंच्या तालुक्यातील तब्बल १९ शाळा शिक्षकाविना आहेत.
#gadchiroli #vidarbha #maharashtra #marathinews #zp #school #government
84 Zilla Parishad schools without teachers in Gadchiroli district; Neglect of the Education Department.