शिक्षक संघाच्या लाक्षणिक धरणे आंदोलनाला माजी खासदार अशोक नेते यांचा पाठिंबा.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

शिक्षक संघाच्या लाक्षणिक धरणे आंदोलनाला माजी खासदार अशोक नेते यांचा पाठिंबा.!

दि. 29 जुलै 2024 
MEDIA VNI 
शिक्षक संघाच्या लाक्षणिक धरणे आंदोलनाला माजी खासदार अशोक नेते यांचा पाठिंबा.! 
- शिक्षक संघाच्या मागण्या शासन दरबारी लावून धरणार.!
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विनाअनुदानित शाळा कृती समिती व शिक्षक समन्वय संघ गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर ‌आज लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला माजी खा. अशोक नेते यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. एवढेच नाही तर मागण्या शासन दरबारी लावून धरण्याचे आश्वासन दिले.
अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दि.०१ जानेवारी २०२४ पासून विनाअट प्रतिवर्षी पुढील टप्पा लागु करण्या संबंधित हे लाक्षणिक धरणे आंदोलन केला आहे.
या आंदोलनाला माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते यांनी भेट देऊन त्यांचे निवेदन स्विकारत त्यांच्या समस्या जाणून घेत शिक्षक संघाच्या मागण्या मि शासन दरबारी लावून आपल्या मागण्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे घेऊन जाऊन मागण्या संबंधित मागणी पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासित मा.खा.नेते यांनी यावेळी केले.
याप्रसंगी आंदोलनाला प्रामुख्याने माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे,भाजपा सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, शिक्षक संघाचे अध्यक्ष मुरली कवाडकर,कार्याध्यक्ष नरेंद्र बोरकर,सचिव मुरलीधर नागोसे तसेच मोठया संख्येने शाळा कृती समितीचे शिक्षक संघ व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सोमवार दि. 29 सोमवार व मंगळवार 30 जुलै 2024 लाक्षणिक धरणे आंदोलनाच्या
- प्रमुख मागण्या -

1) अशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दि.1 जानेवारी 2024 पासून विना अट 2023-24 च्या संचमान्यतेनुसार पुढील टप्पा देऊन प्रतिवर्षी टप्पा लागू करणे.

2) शासन निर्णय 12 16. व 24 मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्रुटी पुर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकडया समान टप्पा वाढ देणे. 

3) राज्यातील पुणे स्तरावरील अधोषीत शाळाना अनुदानास पात्र करूम अनुदान मंजुर करणे

4) 30 जुलै 2024 पर्यंत टप्पा सादसह अन्य मागण्याचा शापान आदेश निर्गमीत करून आधारहिता पुर्वी किमान महीन्याचा वाढीच टप्याचा पगार शिक्षकांच्या खात्यावर जमा करणे
--------------------------------------
यासह:-

1. वाढीव टप्प्याचा शासन आदेश त्वरित निर्गमित करावा .

2. त्रुटी पूर्तता केलेल्या व अघोषित शाळांना अनुदान मिळावे. 
3. 15 मार्च 2024 रोजी चा संचमान्यतेचा आदेश रद्द करावा.

4. जीआर मध्ये प्रचलित नियमानुसार अनुदानाचा उल्लेख करावा.

5. शेवटच्या वर्गाची पट संख्येची अट शिथिल करावी.

6. अंशतः अनुदानित शाळांना जुनी पेन्शन सह सर्व लाभ द्यावेत.
The support of former MP Ashok Nete to the symbolic dharna movement of the teachers' union.
#गडचिरोली #gadchiroli #GadchiroliNews #MaharashtraNews #maharashtra 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->