पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दोनशेहुन अधिक गावाचा संपर्क तुटला; 40 पेक्षा जास्त मार्ग बंद.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गेल्या आठवडाभरापासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी सायंकाळी तीन राष्ट्रीय महामार्गासह 40 मार्ग बंद झाले आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प पडली आहे. यामध्ये गडचिरोली-चामोर्शी, आलापल्ली ते सिरोंचा, आलापल्ली-भामरागड, सिरोंचा-जाफ्राबादा या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील भामरागड तालुक्यासह जवळपास 200 गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयापासून तुटलेला आहे.
परिणामी आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रिय झाले असून दोन दिवसात शंभरहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यातील वैनगंगा, इंद्रावती, वर्धा या या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गोसेखुर्द धरणातून 3.03 लाख क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने पुढील दोन दिवस नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर तेलंगणातील श्रीपदा येल्लमपल्ली या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्यास सिरोंचा तालुक्यातील पूरस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
More than two hundred villages in Gadchiroli district were cut off; More than 40 ways off.! Contact with the village was lost More than two hundred villages in Gadchiroli district were cut off due to floods; More than 40 ways off.!
#गडचिरोली #Gadchiroli #MaharashtraNews #GadchiroliNews #monsoon #rainfall #marathinews