भाजप नेत्याची पोलिसांसमोर महिलेला मारहाण; सुषमा अंधारे यांनी शेअर केला व्हिडिओ.!बघा.. - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

भाजप नेत्याची पोलिसांसमोर महिलेला मारहाण; सुषमा अंधारे यांनी शेअर केला व्हिडिओ.!बघा..

दि. 07 ऑगस्ट 2024 
MEDIA VNI 
भाजप नेत्याची पोलिसांसमोर महिलेला मारहाण; सुषमा अंधारे यांनी शेअर केला व्हिडिओ.!बघा..
Sushma Andhare 
मीडिया वी.एन.आय : 
बुलढाणा : बुलढाणा येथून धक्कादायक घटना उघडकीस आली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने शहरातील पोलीस ठाण्यात एका महिलेला मारहाण केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर शेअर केला.
व्हिडिओमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या नेत्याचे नाव शिवा तायडे असे सांगितले आहे. शिवा तायडे हे मलकापूर कृषी समितीचे अध्यक्ष आहेत, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.

सुषमा अंधारे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक जोडपे एका बाकावर बसलेले दिसत आहे. तर, भाजप नेते तायडे हे महिलेला मारहाण करताना दिसत आहे. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्ती करून तायडे यांना रोखले. त्यानंतर एक महिला देखील नेत्याला मारहाण करण्यापासून थांबवते. नेमके प्रकरण काय आहे, हे संबंधित दाम्पत्य आणि भाजप नेते पोलीस ठाण्यात का पोहोचले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना सुषमा अंधारे यांनी कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'भाजपचा स्थानिक पुढारी आणि बुलढाण्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती शिवा तायडे या गावगुंडाकडून शहरातील पोलीस स्टेशन मध्येच महिलेला मारहाण, थोर ते गृहमंत्री...थोर ते पोलीस कर्मचारी.' सुषमा अंधारे यांनी हा व्हिडिओ शेअर करताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर, आदित्य ठाकरे आणि शिवसेना यूटीबी यांनाही टॅग केले आहे.

सचिन वाझेचा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस - सुषमा अंधारे

डतर्फ पोलीस अधिकारी आणि अँटेलिया तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठिणगी पडली. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते, त्यांच्याविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत असं म्हटलं आहे, असा आरोप वाझेने केला. यावर सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक या तिघांना रुग्णालयात हजर करताना माध्यमांशी बोलण्याची संधी मिळाली नाही. मग ती संधी सचिन वाझेलाच कशी मिळाली? सचिन वाझे इतके दिवस झोपला होता का? त्याला पत्र लिहायचे होते तर इतका वेळ का लागला? वाझेने देवेंद्र फडणवीसांनाच पत्र का लिहिले? हे प्रश्न उपस्थित होतात, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस सचिन वाझेचा बोलविता धनी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
BJP leader beats woman in front of police; Video shared by Sushma Andhare.!Watch..
#Bhuldhana #buldhana #MaharashtraNews #maharashtra #politics #government #ShushmaAndhare #devendrafadnavis 
#viralnews #viralvideo 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->