दि. 27 ऑगस्ट 2024
गडचिरोली : श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : विश्व हिंदु परिषद स्थापना दिवस षष्ठी पुर्ती वर्ष निमित्य श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन दि.२७ ऑगस्ट ला करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन संजय दैने गडचिरोली जिल्हाधिकारी हे राहणार आहेत तर घीसुलालजी काबरा जिल्हासंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गडचिरोली,निलोत्पाल पोलीस अधीक्षक गडचिरोली, सुशील हिंगे जिल्हाध्यक्ष विश्व हिंदू परिषद बजरंग दल, शंकर बोरकर जिल्हामंत्री विश्व हिंदू परिषद बजरंग दल गडचिरोली तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ सुरेश परसावार विदर्भ प्रांत धर्माचार्य संपर्क प्रमुख, तर प्रमुख अतिथी पराग दवंडे चंद्रपुर विभाग मंत्री विश्व हिंदू परिषद हे लाभणार आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन माजी खासदार अशोक नेते,आमदार डॉ. देवराव होळी गडचिरोली विधानसभा, प्रशांत वाघरे जिल्हाध्यक्ष भाजपा गडचिरोली, डॉ मिलिंद नरोटे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा तथा प्रभारी आदिवासी आघाडी गडचिरोली, डॉ. नामदेवराव उसेंडी माजी आमदार भाजपा गडचिरोली,योगिता पिपरे माजी नगराध्यक्ष नगर परिषद गडचिरोली, डॉ. चंदा कोडवते भाजपा नेत्या गडचिरोली हे असणार आहेत.
श्रीकृष्ण जन्माष्टमी शोभायात्रा ही दुपारी २ वाजता श्रीराम मंदिर सर्वोदय वार्ड येथून निघून मार्गक्रमण करीत देवकुले प्रांगण येथे पोहचणार आहे.
सायंकाळी ५ वाजता जन्माष्टमी सोहळा व हिंदु जागरण सभा व दहीहंडी देवकुले प्रांगण अयोध्या नगर चंद्रपूर रोड गडचिरोली येथे होणार आहे. तरी होणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी कार्यक्रमाला असंख्य लोकांनी आवर्जून हजेरी लावावी अशी असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.