आयएएस शुभम गुप्ता यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करा : प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

आयएएस शुभम गुप्ता यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करा : प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे

दि. 23 ऑगस्ट 2024
MEDIA VNI 
आयएएस शुभम गुप्ता यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करा : प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे
- राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.! 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा हा अतिमागास, आदिवासी म्हणून प्रचलित आहे.या जिल्यात भामरागड व एटापल्ली तालुका हे राज्यपालाने दत्तक घेतलेले तालुके आहेत. या तालुक्यात आदिवासी लोकांना शासन हजारो नाही तर करोडो रुपयांच्या योजना राबवून त्यांना वर आणण्याचा प्रयत्न करीत असतो. पण या तालुक्यात गाय वाटप घोटाळ्यात दोषी असलेले तत्कालिन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता आयएएस यांना निलबिंत करून अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी राष्ट्रीय मानवधिकार संघटन (असोसिएशन) नई दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांचेसह भामरागड व एटापल्ली तालुक्यातील पिडीत यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
भामरागड येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी सन 2021 ते 2023 मध्ये गाय वाटप योजने अंतर्गत लाखो रुपयाचा गैरव्यवहार केला. अप्पर आयुक्त यांच्या चौकशीत गुप्ता दोषी आढळले. आदिवासी समाजातील लाभार्थी व कर्मचाऱ्यांना शिविगाळ करून धमकावणे, शेकडो कोटीचा भ्रष्टाचार करणे, एटापल्ली येथे कार्यरत असतांना कंत्राटदारांना धमकावणे.भामरागड येथील आदिवासी महिला भारती इष्टाम या आदिवासी महिलेचा छळ करणे, आपल्या पदाला दुरुपयोग करून अनेकांवर गुन्हे दाखल करणे आदि कारनामे करणाऱ्या शुभम गुप्ता यांचेवर गुन्हा दाखल करून अट्रोसिटी अतंर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.
पत्रकार परिषदेला प्रणय खुणे, नगरसेवक मनोहर बोरकर, आदिवासी महिला भारती इष्टम, यशोदा देऊ पुंगाटी, शंकर ढोलगे, विनोद चव्हाण यांचेसह भामरागड व एटापल्ली तालुक्यातील अनेक पिडीत हजर होते.
File a case against IAS Shubham Gupta under the Atrocities Act: State President Pranay Khune
- Statement given to Governor, Chief Minister, Deputy Chief Minister, Commissioner and Collector.
#गडचिरोली #Gadchiroli #GadchiroliNews #MaharashtraNews #maharashtra marathinews #MediaVNI 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->