दि. 23 ऑगस्ट 2024
प्रशिक्षणातून पक्षात मोठे होण्याची कार्यकर्त्यांना संधी; - आमदार डॉ. देवराव होळी- गडचिरोली येथे भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन.!
- मुख्य मार्गदर्शक म्हणून पूर्व संघ प्रचारक प्रख्यात वक्ते अमोलजी पुसदकर तसेच भारतीय विचार मंचाचे क्षेत्र संयोजक पूर्व संघ प्रचारक सुनीलजी किटकरू यांची उपस्थिती...
- प्रशिक्षणानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण...
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : कोणत्याही पार्टीचा कार्यकर्ता हा आपल्या पक्षाला वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतो परंतु तो जर प्रशिक्षित नसेल तर त्या पक्षाची वाढ होण्यास व पक्ष मोठा होण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे पक्षाला मोठे करण्यासाठी कार्यकर्त्याने प्रशिक्षित होण्याची आवश्यकता असून त्या प्रशिक्षणातूनच कार्यकर्त्यालाही मोठे होण्याची संधी मिळत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथील कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाच्या प्रास्ताविक प्रसंगी केली. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून पूर्व संघ प्रचारक प्रख्यात वक्ते अमोलजी पुसदकर तसेच भारतीय विचार मंचाचे क्षेत्र संयोजक पूर्व संघ प्रचारक सुनीलजी किटकरू प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मंचावर लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, भाजपा ज्येष्ठ नेते किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेश भूरसे, प्रदेश कार्यकारणी सदस्य रवींद्र ओलारवार, जिल्ह्याच्या महामंत्री योगिताताई पिपरे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, गडचिरोली तालुका अध्यक्ष विलास भांडेकर, धानोरा तालुक्याच्या अध्यक्षा लताताई पुंगाटी, प्रामुख्याने उपस्थित होते.
Opportunities for workers to grow in the party through training; - MLA Dr. Devrao Holi
- Organized BJP worker training class at Gadchiroli. #MaharashtraNews #Gadchiroli #GadchiroliNews #BJP #marathinews #MLA #MediaVNI