महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी आधार प्रमाणिकरण करा.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी आधार प्रमाणिकरण करा.!

दि. 20 ऑगस्ट 2024 
MEDIA VNI 
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी आधार प्रमाणिकरण करा.!
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली :  महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना – 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेबाबत दि.29 जुलै 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सन 2017-18, सन 2018-19 व सन 2019-20 या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त़ रु.50 हजार रुपयेपर्यंत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. या तीन वर्षापैकी शेवटच्या वर्षात जे कर्ज घेतलेले आहे. त्या वर्षाच्या कर्जाची मुददल रक्क़म विचारात घेतली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत जिल्हयातील जिल्हा मध्य़वर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत व खाजगी बँका यांनी या योजनेत पात्र असलेल्या खातेदारांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरलेली आहे. त्या अंतर्गत विशिष्ट़ क्रमांकासहची यादी संबंधीत बँका, जिल्हा उपनिबंधक, व तालुका सहाय्य़क निबंधक कार्यालयात तसेच गावचावडी, ग्रामपंचायत, विकास संस्था येथे प्रसिध्द़ करण्यात आलेली आहे. विशिष्ट़़ क्रमांकासह यादी प्रसिध्द़ झाल्यानंतर त्यातील शेतकऱ्यांनी संबंधीत बँकेत किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणिकरण करावयाचे आहे.
आधार प्रमाणिकरणानंतर पात्र लाभार्थ्यांची प्रोत्साहनपर लाभाची रक्क़म त्यांच्या बँकेच्या सेव्हिंग खात्यावर जमा होणार आहे. आधार प्रमाणिकरणासाठी गेल्यानंतर त्यांचा आधार क्रमांक किंवा त्यांच्या कर्जाची रक्क़म चुकली असेल, तर त्याबाबत त्या शेतकऱ्याने तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवावयाची आहे, अशा प्राप्त़ होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या तर तालुकास्त़रावर संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
तरी गडचिरोली जिल्हयातील तालुका निहाय सिरोंचा- 26, मुलचेरा-32, कुरखेडा-14, कोरची-2, गडचिरेाली-29, एटापल्ली-13, धानोरा-7, देसाईगंज-10, चामोर्शी-72, भामरागड-9, आरमोरी-9, आरमोरी-39 व अहेरी-30 असे मिळुन एकुण 282 आधार प्रमाणिकरण करणे शिल्ल़क असुन, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणिकरण करुन घेणे आवश्य़क असल्याने तालुक्यातील आपले सरकार/सी.एस.सी सेंटर/संग्राम केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. असे जाहीर आवाहन सहकार आयुक्त़ व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य़, पुणे व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जि.गडचिरोली यांनी केलेले आहे.
Verify Aadhaar for incentive benefits under Mahatma Jyotirao Phule Shetkari Debt Relief Yojana.!
#महाराष्ट्र #MaharashtraNews #maharashtra #marathinews #MediaVNI #Gadchiroli 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->