गडचिरोलीत भयानक अपघात! लोहखनिज भरलेल्या ट्रकच्या धडकेत पत्नी ठार, तर पती गंभीर जखमी.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गडचिरोलीत भयानक अपघात! लोहखनिज भरलेल्या ट्रकच्या धडकेत पत्नी ठार, तर पती गंभीर जखमी.!

दि. 12 ऑगस्ट 2024 
MEDIA VNI 
गडचिरोलीत भयानक अपघात! लोह लोहखनिज भरलेल्या ट्रकच्या धडकेत पत्नी ठार, तर पती गंभीर जखमी.!
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : गडचिरोली सेमना - वाकडी फाट्याजवळ अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात ट्रकने मोटारसायकला धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली तर तिचा पती किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.11) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास झाला आहे.
या अपघातात कुंदाबाई जनार्धन आखाडे (वय.70 रा. कुनघाडा रै, ता. चामोर्शी) असे मृत महिलेचे नाव आहे. जनार्दन आखाडे (वय. 73) हे किरकोळ जखमी आहेत. 
कुंदाबाई व जनार्दन हे पती-पत्नी काही कामानिमित्त कुनघाडा येथून त्यांच्या दुचाकीवरुन गडचिरोलीकडे येत होते. दरम्यान, वाकडी फाट्याजवळ मोटारसायकल स्लीप झाली यात कुंदाबाई या रस्त्यावर पडल्या. मागून लोहखनिज भरलेला (एमएच 40 सीटी 7857) क्रमांकाचा ट्रक येत होता. यावेळी तो ट्रक कुंदाबाई यांच्या अंगावरुन गेला त्यात त्या जागीच ठार झाल्या. जनार्दन आखाडे यांच्या हातापायाला आणि डोक्याला किरकोळ मार लागला आहे. ते दवाखान्यात उपचार घेत आहेत.
अपघाताबद्दल माहिती होताच कुनघाडा गावात शोककळा पसरली. अपघात घडताच ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. गडचिरोली पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Terrible accident in Gadchiroli! Wife killed, husband seriously injured in a collision with a truck loaded with iron ore.
#Gadchiroli #गडचिरोली #MaharashtraNews #maharashtra #marathinews #MediaVNI 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->