BSNL ग्राहकांना देणार युनिव्हर्सल सिम कार्ड; देशाच्या कानाकोपऱ्यात मिळणार 4G - 5G नेटवर्क.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

BSNL ग्राहकांना देणार युनिव्हर्सल सिम कार्ड; देशाच्या कानाकोपऱ्यात मिळणार 4G - 5G नेटवर्क.!

दि. 12 ऑगस्ट 2024
MEDIA VNI 
BSNL ग्राहकांना देणार युनिव्हर्सल सिम कार्ड; देशाच्या कानाकोपऱ्यात मिळणार 4G - 5G नेटवर्क.!
मीडिया वी.एन.आय : BSNL News : 
मुबंई : खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel, Vi ने आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्या ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. याचा फायदा घेण्यासाठी BSNL ने अनेक स्वस्त प्लॅन्स लॉन्च केले आहेत.
याशिवाय, देशभरात 4g-5g नेटवर्क देण्यासाठी झपाट्याने टॉवर्सची उभारली केली जात आहे. विशेष म्हणजे, BSNL ने ओव्हर द एअर (OTA) ची घोषणा केली आहे, ज्याद्वारे नवीन ग्राहकांना युनिव्हर्सल सिम (USIM) मिळेल.

या युनिव्हर्सल सिम कार्डच्या मदतीने BSNL च्या ग्राहकांना 4G आणि 5G नेटवर्कचा लाभ मिळेल. म्हणजे, भारतातील ज्या ठिकाणी BSNL चे 5G नेवर्क उपलब्ध असेल, तिथे 5G आणि जिथे 4G उपलब्ध असेल, तिथे 4G नेटवर्क मिळेल. यासाठी त्यांना नवीन सिम कार्ड घेण्याची गरज नाही. फक्त त्यांना आपल्या मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जाऊन थोडे बदल करावे लागतील.

BSNL 4G, 5G रेडी OTA
बीएसएनएलने X वर याबाबत ही माहिती दिली आहे. याची सुरुवात चंदीगडपासून झाली असून लवकरच देशभरात लॉन्च होणार आहे. त्याचा फायदा असा होईल की, ग्राहकांना वेगवान इंटरनेट आणि चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. OTA प्लॅटफॉर्म 4G आणि 5G दोन्ही नेटवर्कला सपोर्ट करेल. BSNL ची 4G सेवा मार्च 2025 पर्यंत देशभरात सुरू होणार आहे. यासाठी 15 हजार टॉवर्स बसवण्यात आले असून, ऑक्टोबरअखेर 80 हजार अतिरिक्त टॉवर्स बसवण्यात येणार आहेत. तसेच, पुढील वर्षीच 5G सेवाही सुरू केली जाणार आहे.

BSNL मध्ये सिम पोर्ट कसे करावे?
आता तुम्ही BSNL मध्ये सिम कार्ड पोर्ट करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून 1900 वर एसएमएस पाठून मोबाइल नंबर पोर्ट करण्याची विनंती करावी लागेल. यासाठी मेसेज बॉक्समध्ये 'PORT' टाइप करा आणि एका स्पेसनंतर तुमचा 10 अंकी मोबाइल नंबर टाका. यानंतर तुमचा मोबाइल नंबर पोर्ट करण्यासाठी तुम्हाला बीएसएनएल सेवा केंद्रावर जावे लागेल.

BSNL चे 5 सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स...

• BSNL ने एक उत्तम 4G प्लॅन लॉन्च केला आहे. 395 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये अनलिमेटेड कॉलिंग, 100 SMS आणि दररोज 2 GB डेटा मिळतो. हा प्लॅन फक्त 2399 रुपयांचा आहे. तर, रिलायन्स जिओचा 365 दिवसांचा प्लॅन 3599 रुपयांमध्ये आणि एअरटेलचा 365 दिवसांचा प्लॅन ​3999 रुपयांचा आहे.

• BSNL द्वारे ऑफर केलेला सर्वात स्वस्त प्लॅन 107 रुपयांचा आहे, ज्यात 35 दिवसांच्या वैधतेसह 3GB 4G डेटा आणि 200 मिनिटे व्हॉइस कॉलिंग मिळते. याशिवाय, BSNL च्या 108 रुपयांच्या विशेष प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 1GB डेटा मिळतो.

• BSNL च्या 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये दीर्घ वैधता मिळते. 200 रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 70 दिवसांच्या वैधतेसह पहिल्या 18 दिवसांसाठी 2GB 4G डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS दररोज मिळतात. तर, 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये 70 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि 2GB डेटा मिळतो.

• BSNL च्या 485 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 82 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यामध्ये तुम्हाला दररोज 1.5 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतील. 
Universal SIM card to BSNL customers; 4G - 5G network will be available in every corner of the country.  #BSNL #india #4G #5G #BSNL5G #marathinews #MediaVNI 
#universal 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->