दि. 09 ऑगस्ट 2024
माडे आमगांव येथे जल्लोषात जागतिक आदिवासी दिन साजरा.! मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : जगभरात दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिन साजरा केला जातो. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दुरावलेल्या जगभरात राहणाऱ्या आदिवासींचा सन्मान करण्यामागे एक खास कारण आहे.
केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये आदिवासी समाजाचे लोक राहतात. ज्यांची जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि चालीरीती सामान्य लोकांपेक्षा भिन्न आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटल्यामुळे आदिवासी समाज आजही मागासलेला आहे. त्यामुळेच भारतासह अनेक देशांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांकडे लक्ष वेधण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो.
संपूर्ण देशासह आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील 'माडे आमगांव' येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात 'बहुउद्देशीय बिरसामुंडा मंडळ' माडे आमगांव यांच्या सहकार्याने आदिवासी माडिया समुदाय सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावात जल्लोषात नृत्यासह रॅली काढून जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.