मतदार यादी दुरुस्तीसाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदत.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

मतदार यादी दुरुस्तीसाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदत.!

दि. 10 ऑगस्ट 2024 
MEDIA VNI 
मतदार यादी दुरुस्तीसाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदत.! 
- मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर.! 
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता दिनांक 06 ऑगस्ट, 2024 रोजी प्रारूप मतदार यादीची प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीत आपले नाव असल्याबाबत मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) तसेच तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयात भेट देऊन किंवा व्होटर हेल्पलाइन ॲप यावरून खात्री करावी. मतदार यादीत दुरुस्ती, वगळणी, मतदार ओळखपत्राबाबत विनंती अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करावेत. यासाठी फॉर्म नंबर 6,7 किंवा 8 चा वापर करावा.

अर्ज करण्याचे कालावधी :
दिनांक 06 ऑगस्ट 2024 (मंगळवार) पासून सुरु होऊन 20 ऑगस्ट 2024 (मंगळवार) पर्यंत चालेल. या
कालावधीत मतदार नोंदणी करण्यासह, मतदार यादीतील नाव, पत्ता, आणि अन्य तपशील पडताळून, त्यात बदल सुधारणा करण्याची संधी नागरिकांना असणार आहे.

मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर..
दिनांक 10 ऑगस्ट, 2024 (शनिवार), दिनांक 11 ऑगस्ट, 2024 (रविवार), दिनांक 17 ऑगस्ट, 2024
(शनिवार) व दिनांक 18 ऑगस्ट, 2024 (रविवार) या कार्यक्रमाच्या काळात युवा नवमतदार, दिव्यांग, महिला,
तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जाती जमातीच्या व्यक्ती या लक्षित
घटकांसाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील. कार्यक्रमाच्या कालावधीतील शनिवार आणि रविवार या दिवशी या शिबिरांचे आयोजन केले जाईल. या शिबिरांच्या माध्यमातून लक्षित घटकांना मतदार नोंदणीची संधी सुलभरित्या उपलब्ध करून दिली जाईल, असे निवडणूक विभागाने कळविले आहे.
The deadline for correction of voter list is 20 August. 
- Special camp for voter registration.!
#गडचिरोली #Gadchiroli #MaharashtraNews #maharashtra #marathinews #election #voter #voterid #vidhansabha #election2024

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->