दि. 25 ऑगस्ट 2024
वनविभागातील वनमजुर, वनरक्षक व वनपाल यांचे विविध समस्यांचे निवारण करणेबाबतची आढावा बैठक संपन्न.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोली वनवृत्तातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरीता दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी डॉ.अजय पाटील, केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नती वनपाल संघटना नागपूर, शाखा गडचिरोली यांचे नेतृत्वात मा. मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली यांचे दालनात सभा आयोजीत केली होती. क्षेत्रीय कर्मचा-यांच्या तकारीबाबत बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करून सर्व समस्यांचे तात्काळ निवारण करण्याबाबत मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली एस. रमेशकुमार यांनी संघटनेला आस्वाशीत केले.
सदर बैठकीत खालील समस्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यात वनविभागातील कर्मचा-यांना विशेष कृती कार्यक्रम अंतर्गत एकस्तर पदोन्नतीचा लाभ व 15 टक्के प्रोत्साहन भत्ता 7 व्या वेतन आयोगानुसार देण्यात यावा, बक्षी समितीचा खंड 2 लागु करण्यात यावा, महाराष्ट्र नागरी सेवा जेष्ठतेचे विनियमन नियमावली 2021 लागु करण्यात यावी, विभागीय चौकशी व निलंबन प्रकरणे निकाली काढण्यात यावे, कर्मचा-यांचे सेवा पुस्तके अदयावत करण्यात यावे, नियतक्षेत्राचे पुर्नगठन करण्यात यावे, वनरक्षक व वनपाल याना मदतनिस देण्यात यावे, सिरोंचा वनविभागातील कर्मचा-यांच्या `वैदयकीय बिले मंजुर करण्यात यावे, संगणक चालक यांचे पि.सी.सी.एफ कार्यालयातील ऑपरेटर प्रमाणे वेतन देण्यात यावे, वनविभागातील वनवसाहत येथील इमारतीचे दुरूस्ती करण्याबाबत 11 वन्यप्राणी व वन्यजीव व्यवस्थापन कार्यशाळा आयोजीत करणेबाबत, 12 वनमजुरांची सेवाजेष्ठता प्रकाशीत करणेबाबत इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सदर सभेला वृत्त अध्यक्ष, सिध्दार्थ मेश्राम, केंद्रीय संघटक, पुनम बध्दावार, भारत साबळे, सुनिल पेंदोरकर, किशोर सोनटक्के, सुबिनय सरकार, ईश्वर मांडवकर, अनंत ठाकरे, रूपेश मेश्राम, रवि जुवारे, नितेश तुमपल्लीवार, विकास शिवणकर व संघटनेचे पदाधिकारी, वनपाल, वनरक्षक, वनमजुर मोठया संख्येने उपस्थीत होते.
#Gadchiroli #MediaVNI