दि. 24 सप्टेंबर 2024
उपायुक्त माधुरी मडावी यांनी केला काँग्रेस पक्षात प्रवेश.!- काँग्रेस प्रवेशाने धास्तावले स्पर्धक व विरोधक.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : अमरावती महानगरपालिकेच्या उपायुक्त पदाचा पदभार काही दिवसांपूर्वी स्वीकारलेल्या माधुरी मडावी यांनी अचानकपणे आपल्या पदावरून निवृत्त होऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच त्यांनी काँग्रेस पक्ष प्रवेश केलेला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या सरचिटणीस पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. येत्या काळात त्या विधानसभा गडचिरोली किंवा विधानसभा आरमोरी येथून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असू शकतात.
मुंबई येथील महिला काँग्रेस प्रदेश कमिटी च्या कार्यालयात प्रदेश अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करण्यात आला असून त्यांची महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
शहराच्या स्वच्छतेसाठी दबंग महिला अधिकरी म्हणून वडसा,पवनी,दिग्रस, यवतमाळ येथे चांगली कामे केल्याने जनाधार होता.तसेच राजकीय हस्तक्षेपाने यवतमाळ हुन बदली केल्यानंतर यवतमाळ येथील जनतेने आंदोलन सुद्धा केले होते.
अमरावती उपायुक्त म्हणून कारभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तडकाफडकी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला व राजीनामा मंजूर होताच त्यांनी काँग्रेस पक्ष प्रवेश केला.काँग्रेस पक्ष प्रवेशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व महाराष्ट्र विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी माधुरी मडावी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
एक उच्चशिक्षित प्रशासकीय सेवेचा अनुभव असणाऱ्या माधुरी मडावी यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाने विधानसभा गडचिरोली व विधानसभा आरमोरी येथील काँग्रेस पक्षातील स्पर्धक व विरोधक धास्तावले दिसत आहेत.
Deputy Commissioner Madhuri Madavi joined the Congress party.
- Contenders and opponents are scared by the entry of Congress. #Gadchiroli #गडचिरोली
#GadchiroliNews #maharashtra #MediaVNI