दि. 07 सप्टेंबर 2024
आदर्श शिक्षक पुरस्काराने श्रीकांत काटेलवार यांचा गौरव.! मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षकदिनी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 हा काटेलवार यांनी गेल्या सोळा वर्षांच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यांतील आदिवासीं बहुल तालुक्यातील दोडीपाडा, पिंपळद व सध्या गडचिरोली जिल्ह्यांतील एटापल्ली तालुक्यांतील वाळवी शाळेत विविध नावीन्यपूर्ण असे उपक्रम राबवून राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत महत्त्वपूर्ण
योगदान दिले आहे. आज पर्यंत चार शाळेचा शून्यातून कायापालट केला. वाळवी शाळेची राष्ट्रिय पटलावर ओळख निर्माण केली. शाळेच्या शोधनिंबधाची राष्ट्रिय परिषदेसाठी निवड झाली. शासनातर्फे शाळेची व्हिडीओ डॉक्युमेंटरी ची निर्मिती. शाळेची राज्य विधि मंडळात चर्चा सुद्धा झाली. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थे तर्फे आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत काटेलवार यांच्या नवोपक्रमाला राज्यात पाचवा क्रमांक प्राप्त झाला. त्यांच्या कार्याची शासनाने दखल घेऊन त्यांना शिक्षक दिनी अभूतपूर्व सोहळ्यात क्रांतिज्योती सावित्री माई राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री शिंदे व शिक्षणमंत्री केसरकर यांनी कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
Gadchiroli : Shrikant Katelwar honored with ideal teacher award!
#गडचिरोली #Gadchiroli #GadchiroliNews #MaharashtraNews #MediaVNI