गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-8, गडचिरोली-9 आणि अहेरीतून-12 उमेदवार रिंगणात.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-8, गडचिरोली-9 आणि अहेरीतून-12 उमेदवार रिंगणात.!

दि. 06 नोव्हेंबर 2024 
MEDIA VNI 
गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-8, गडचिरोली-9 आणि अहेरीतून-12 उमेदवार रिंगणात.!
- उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप.!
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : विधानसभा निवडणूकसाठी आरमोरी मतदारसंघातून 8, गडचिरोलीतून 9 आणि अहेरीतून 12 उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. या सर्व उमेदवारांना संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक चिन्हाचे वाटप केले आहे.
विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे.

67-आरमोरी विधानसभा मतदार संघ :  
राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार : अनिल (क्रांती) तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी (हत्ती), कृष्णा दामाजी गजबे- भारतीय जनता पार्टी (कमळ), रामदास मळूजी मसराम- इंडियन नॅशनल काँग्रेस (हात). 
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी -कांशी राम (किटली), मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर).
इतर उमेदवार : आनंदराव गंगाराम गेडाम,अपक्ष (बॅट), खेमराज भाऊ नेवारे- अपक्ष(ऊस शेतकरी), डॉ. शिलु चिमुरकर पेंदाम- अपक्ष (रोड रोलर).

68-गडचिरोली विधानसभा मतदार संघ :
राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार : 
मनोहर तुळशिराम पोरेटी-इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), डॉ. मिलिंद रामजी नरोटे- भारतीय जनता पार्टी (कमळ), संजय सुभाष कुमरे- बहुजन समाज पार्टी(हत्ती)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : जयश्री विजय वेळदा- पीझन्टस् ॲन्ड वर्कर्स् पार्टी ऑफ इंडिया (ऊस शेतकरी), भरत मंगरुजी येरमे- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), योगेश बाजीराव कुमरे- गोंडवाना गणतंत्र पार्टी (करवत).
इतर उमेदवार : दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष (ऑटो रिक्शा), बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे- अपक्ष(बॅट), डॉ. सोनल चेतन कोवे- अपक्ष (शिट्टी)
69- अहेरी विधानसभा मतदार संघ : अत्राम धर्मरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी(घड्याळ), अत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा – नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार (तुतारी वाजवणारा माणूस), रमेश वेल्ला गावडे- बहुजन समाज पार्टी (हत्ती), संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन).
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : निता पेंटाजी तलांडी- प्रहर जनशक्ती पार्टी(बॅट). 
इतर उमेदवार : आत्राम दिपक दादा – अपक्ष (टेबल), कुमरम महेश जयराम- अपक्ष(अंगठी), गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष (स्टूल), नितीन दादा पदा- अपक्ष (कढई), राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम- अपक्ष(ऑटो रिक्शा), लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष (ट्रम्पेट), हनमंतु गंगाराम मडावी- अपक्ष (रोड रोलर).
Armory-8, Gadchiroli-9 and Aheritoon-12 candidates in Gadchiroli district.
- Allotment of election symbols to the candidates.!  #गडचिरोली #Gadchiroli #Vidhansabha 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->