दि. 20 नोव्हेंबर 2024
गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान, सर्वात कमी मुंबई शहरात, इतर आकडेवारी बघा..मीडिया वी.एन.आय :
मुबंई : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडल्या आहेत यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात 58. 52 टक्के मतदान झाला आहे. मागच्या वर्षी म्हणजे मागच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात 61 टक्के मतदान पार पडलं होत.
यावेळी सर्वाधिक गडचिरोली जिल्ह्यामध्ये 69.63% मतदान झालं असून सर्वात कमी मुंबई शहर शहरात 49.7% मतदान पार पडले आहे. यातच आता राज्यातील विविध जिल्ह्यातील टक्केवारी समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. यात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांचे भविष्य आज मतदान पेटीत बंद झाला आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून देवेंद्र फडवणीस, अजित पवार, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे तसेच इतर अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेत. त्यांच्यासाठी आता 23 नोव्हेंबर हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.
यातच राज्यात पाच वाजेपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात 61.95% मतदान पार पडलं होतं. यात अकोला जिल्ह्यात 56.16%, अमरावती जिल्ह्यात 58.48%, औरंगाबाद जिल्ह्यात 60.383%, बीड जिल्ह्यात 60.62%, भंडारा जिल्ह्यात 65.88%, बुलढाणा जिल्ह्यात 62.84%, चंद्रपूर जिल्ह्यात 64.48%, धुळे जिल्ह्यात 59.75%, गडचिरोली जिल्ह्यात 69.63% ,गोंदिया जिल्ह्यात 65.09%, हिंगोली जिल्ह्यात 61.18%, जळगाव जिल्ह्यात 54.69, टक्के मतदान पार पडला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 67.97%, लातूर जिल्ह्यात 61. 43%, मुंबई शहर 49.7%, मुंबई उपनगर 51.76%, नागपूर जिल्हा टक्के नांदेड ५० ५५.८८, टक्के नंदुरबार 63.72%, नाशिक 59.85%, उस्मानाबाद 58.69, टक्के पालघर 59.31%, परभणी 62.73, टक्के पुणे ५४.०९, टक्के रायगड 61.1%, रत्नागिरी 60.35%, सांगली 63.28%, सातारा 64.16%, सिंधुदुर्ग 62.6% सोलापूर 57.9% ठाणे 49.76%, वर्गात 63.50%, वाशिम 57.23%, यवतमाळ 61.22 टक्के मतदान पार पडले आहे.
Highest polling in Gadchiroli district, lowest in Mumbai city, see other statistics..
#गडचिरोली #Gadchiroli #GadchiroliNews #Maharashtra #Vidhansabha #election2024