दि. 28 नोव्हेंबर 2024
आमदार डॉ. मिलींद नरोटे यांचा महायुतीतर्फे सत्कार.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : नवनिर्वाचित आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे 27 नोव्हेंबरला धानोरा शहरात प्रथम आगमन झाले असता, धानोरा तालुक्यातील भाजपा महायुतीच्या पदाधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी लाडक्या बहिणींकडून औक्षण करण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉ. नरोटे यांनी हा माझा विजय नसून महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या कामाला लागा, मी तुमच्यासोबत आहे असे बोलून सर्वांचे आभार मानले.
धानोरा तालुका पदाधिकार्यांसोबत बसून तालुक्यातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी धानोरा ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या व समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्याचे आश्वासन दिले. रुग्णालयाच्या सुरु असलेल्या बांधकामाचीही त्यांनी पाहणी केली. आमदार डॉ. नरोटे यांनी यावेळी सिंचन, कृषी, रोजगार हमी, घरकुल, पांदण, रस्ते, विहीरी, रस्त्याच्या समस्या यासह विविध समस्यांवर चर्चा केली. त्यानंतर जिप प्राथमिक शाळा व जिप हायस्कूल येथे भेट देऊन शाळेच्या अडचणी जाणून घेतल्या. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते साईनाथ साळवे, अनंत साळवे, भाजपचे धानोरा तालुकाध्यक्ष लता पुंगाटे, माजी नगराध्यक्ष लीना साळवे, शहराध्यक्ष सारंग साळवे, शिंदे सेना तालुकाध्यक्ष सोपान मशाखेत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष चंदू किरंगे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
MLA Dr. Milind Narote felicitated by Mahayutti.!