दि. 10 नोव्हेंबर 2024
गडचिरोली : २ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षली महिलेचे आत्मसमर्पण.!मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील कुगलेर येथील रहिवासी असलेल्या लक्ष्मी बंडे मज्जी या ४२ वर्षीय नक्षल महिलेने शनिवारी (दि. ९) गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केले.
लक्ष्मी मज्जी ही २०१७ मध्ये भामरागड दलम आणि इंद्रावती एरिया कमिटीमध्ये चेतना नाट्य मंचची सदस्य म्हणून भरती झाली. आजतागायत ती तेथे कार्यरत होती. राज्य शासनाने तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तिचा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे काय, याविषयी पडताळणी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. २००५ मध्ये आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ६७८ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.
आतापर्यंत ३० जणांचे आत्मसमर्पण.!
दरम्यान, २०२२ पासून आतापर्यंत ३० माओवाद्यांनी पोलिसांना शरण येणे पसंत केले. यामुळे नक्षल्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली आहे. आत्मसमर्पण योजनेतून त्यांना बक्षीस स्वरुपात रक्कम, राहायला घर, रोजगार अशा सोयीसुविधा पुरविण्यात येतात,
यासाठी नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल , कमांडंट दाओ इंजिरकान कींडो हे परिश्रम घेत आहेत.
Gadchiroli: Surrender of a Naxalite woman with a reward of 2 lakhs.!
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra