दि. 14 नोव्हेंबर 2024
गडचिरोली : १५ नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आष्टी व कुरखेडा येथे प्रचार दौरा.! मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : वाढत्या थंडीसोबत आता विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे.
भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची १५ नोव्हेंबरला कुरखेडा, आणि आष्टी येथे जाहीर सभा होणार आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे भाजपा उमेदवार मिलिंद नरोटे व आरमोरी मतदार संघातील महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे, यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर प्रचार सभा शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय आष्टी, व दुपारी १ वाजता श्रीराम महाविद्यालय, श्रीराम मंदिराच्या प्रांगणात, कुरखेडा येथे होणार आहे. Gadchiroli: Union Minister Nitin Gadkari's campaign tour to Ashti and Kurkheda on November 15! #Gadchiroli #गडचिरोली