दि. 13 नोव्हेंबर 2024
विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा : भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे
- 15 नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गडचिरोली प्रचार दौरा.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : सर्वसामान्यांच्या विकासासाठी भाजपने अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या असून लोकांचा कल महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याकडे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी जनतेने जिल्ह्यातील तिनही महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी केले आहे.पक्षाच्या जाहीरनाम्यातील घोषणांची व भाजप सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेची माहिती देण्याकरिता येथील लँडमार्क हॉटेलमध्ये भारतीय जनता पार्टीच्यावतीने पत्रपरिषद बोलाविण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या पत्रपरिषदेला माजी खासदार अशोक नेते, विधानसभाप्रमुख प्रमोद पिपरे, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, महामंत्री योगिता पिपरे, महिला आघडीच्या नेत्या डॉ. चंदा कोडवते, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, अरुण हरडे, प्रकाश गेडाम, रमेश भुरसे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना वाघरे म्हणाले, जनता भाजप सरकारवर खुश आहे. भारतीय जनता पक्षाने गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देत गडचिरोलीतील पर्यटन, कृषी, आरोग्य, रोजगार आदी मुद्यांवर आधारित विकासाचा आराखडा तयार केला असून या विकासकामांकरिता गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून भाजपचे उमेदवार डॉ. मिलिंद नराटे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नेते संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जनसंपर्कात व्यस्त आहेत. जनतेपर्यंत पोहोचत आहेत. बाहेर जिल्ह्यातूनही गडचिरोलीत प्रचाराकरिता प्रवासी कार्यकर्ते, आदिवासी नेते आले आहेत. त्यांच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू असून पक्षात कुठल्याही प्रकारची बंडखोरी झाली नसल्याचे वाघरे यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील तिनही जागी महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा आशावाद वाघरे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी माजी खासदार अशोक नेते व माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनीसुद्धा महायुतीच्या उमेदवारांना निवडून दिल्यास जिल्ह्यात विकासासाठी निधी आणता येईल आणि गडचिरोली जिल्ह्याचा विकास करता येईल, असे सांगून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी साकडे घातले.
Make Mahayuti candidates win for development: BJP district president Prashant Waghre
- Union Minister Nitin Gadkari's campaign tour to Gadchiroli on November 15.!