दि. 09 डिसेंबर 2024
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.!
- रक्तदान शिबिर, अन्नदान व रुग्णांना फळ वाटप यासह विविध कार्यक्रमांचे नियोजन.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचा १० डिसेंबर रोजी वाढदिवस असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर, रुग्णांना फळ वाटप गडचिरोली येथे माणुसकीच्या घासंतर्गत अन्नदान, मनोरुग्णांना ब्लॅंकेटचे वाटप, फळ वाटप यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून गडचिरोली येथे आर के सिविलेशन हॉलमध्ये दुपारी ३ वाजता वाढदिवस कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मित्र परिवाराच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
Former MLA Dr. Organized various programs on the occasion of Devrao Holi's birthday.
- Planning various programs including blood donation camp, food donation and fruit distribution to patients.
#Gadchiroli