दि. 11 डिसेंबर 2024
Gadchiroli Crime : गडचिरोली जिल्हा न्यायालयात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाचा गोळी लागून मृत्यू.! मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli Crime) येथील जिल्हा न्यायालयात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाकडून स्वत:ची बंदुक असताना 8 राऊंड फायर झाले. त्यातील 8 पैकी 3 गोळ्या स्वत:च्या छातीत घुसल्याने पोलीस कर्मचाराचा मृत्यू झालाय.
सुरक्षेसाठी तैनात असलेला पोलीस (Police) गाडीत बसलेला असताना ही घटना घडली आहे.
अनावधानाने गोळी झाडली गेली, अन् पोलीस कर्मचाऱ्याने जीव गमावला.!
अधिकची माहिती अशी की, जिल्हा न्यायालयाच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांच्या बंदुकीतून गोळी सुटली आणि स्वत:लाच लागली. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. जिल्हा पोलीस दलात नेमणुकीस असलेले पोवालदार उमाजी होळी, हे जिल्हा न्यायाधीश गडचिरोली यांचे एस्कॉर्ट ड्युटीकरीता कर्तव्यावर हजर होते. जिल्हा न्यायालय गडचिरोली येथील आवारात गाडीत बसलेले होते. यावेळी त्यांच्या स्वत:च्या ताब्यातील बंदुक हाताळताना हत्यारातून गोळी झाडली जाऊन 8 पैकी 3 गोळ्या छातीत लागल्याने ते जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी होळी यांना मृत घोषित केले आहे. प्रथमदर्शनी होळी यांचेकडून अनावधानाने गोळी झाडली गेल्याचे दिसून येते, असं पोलिसांनी सांगितले आहे.
Gadchiroli Crime: A policeman posted for security in Gadchiroli district court was shot dead.
#Gadchiroli