दि. 28 जानेवारी 2025
Police Bharti: तरुणांनो तयारीला लागा! १०,००० पदांसाठी पोलिस भरती होणार; फेब्रुवारीत सुरु होणार प्रक्रिया.!मीडिया वी.एन.आय :
मुबंई : अनेक तरुणांचे पोलिस होण्याचे स्वप्न असते. सरकारी विभागात पोलिस म्हणून काम करावे, अशी इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पोलिस भरतीमध्ये आता १०,००० जागा भरण्यात येणार आहेत.
त्यामुळे जर तुम्हीही पोलिस भरतीची तयारी करत असाल तर लवकरच ही भरती सुरु होणार आहे. (Police Bharti 2025)
राज्यात १०,००० पदांसाठी ही भरती होणार आहे. फेब्रुवारीमध्ये ही भरतीप्रक्रिया सुरु होणार आहे. यामध्ये डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणारी पदेदेखील भरली जाणार आहेत. यामध्ये पोलिस भरतीचा मैदानी टप्पा पावसाळ्याआधी पूर्ण केला जाणार आहे.
वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ही भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे जर तुमचेही पोलिस होण्याचे स्वप्न असेल तर ते लवकरच पुर्ण होणार आहे.
वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ही भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जर तुमचेही पोलिस होण्याचे स्वप्न असेल तर ते लवकरच पुर्ण होणार आहे.
पोलिस भरती कशी होणार? (Police Bharti Process)
पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी काही पात्रता आणि निकषांची पूर्ति करावी लागते.
यानंतर पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा, शारीरिक तपासणी आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात.
सर्वप्रथम उमेदवारांना ग्राउंड परीक्षेसाठी बोलावले जाते. त्यात उत्तीर्ण झाल्यावरच लेखी परीक्षा घेतली जाते.
पोलिस भरतीसाठी तयारी करताना तरुणांना शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.
पोलिस भरतीसाठी वयोमर्यादा ठरलेले असते. पुरुष उमेदवाराची उंची १६५ सेंटीमीटर असावी. तर महिला उमेदवाराची उंची १५५ सेंटीमीटर असावी. तर छाती ७९ सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी.
पोलिस भरतीसाठी तरुण अनेक वर्षांपासून तयारी करत असतात. पोलिस अकॅडमीत जाऊन प्रशिक्षण घेत असतात. याचसोबत लेखी परीक्षेचाही अभ्यास करत असतात. यासाठी धावणे, व्यायाम या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. जर तुम्ही या परीक्षांमध्ये पास झालात तर तुमचे पोलिस होण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार.
Police Bharti 2025 : Get ready guys! Police recruitment for 10,000 posts; The process will start in February.