दि. 26 फेब्रुवारी 2025
गडचिरोली : युवतीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी निलंबित पोलिस शिपायाला अटक.!मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : लग्नाचे आमिष दाखवून युवतीचे लैंगिक शोषण करणाऱ्या निलंबित पोलिस शिपायाला गडचिरोली पोलिसांनी सोमवारी (दि.२४) अटक केली. मनोज सुंदरलाल धुर्वे (वय ३०, रा.आलापल्ली,ता.अहेरी) असे या पोलिस शिपायाचे नाव आहे.
मनोज आणि पीडित युवतीची फेसबूकच्या माध्यमातून ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर मनोजने त्या युवतीकडे शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची मागणी केली. युवतीने लग्नाची गळ घातली असता मनोजने अनेकदा तिचे शारीरिक शोषण करीत लग्न करण्याचे वचन दिले.
परंतु १० फेब्रुवारी २०२५ पासून त्याने पीडित युवतीशी लग्न करण्यास नकार देत तिच्याशी बोलणे बंद केले. यामुळे युवतीने गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी २४ फेब्रुवारीला आरोपी मनोज धुर्वे याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगडजुडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विशाखा म्हेत्रे प्रकरणाचा तपास करीत आहेत. आरोपी मनोज धुर्वे हा पूर्वी पोलिस दलात शिपाई पदावर कार्यरत होता. सहा महिन्यांपूर्वीच त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
Gadchiroli: Suspended police constable arrested for sexually abusing a young woman.
#गडचिरोली #Gadchiroli #Crime #gadchirolipolice #Maharashtra #MediaVNI