दि. 13 फेब्रुवारी 2025MEDIA VNI
गडचिरोली : ड्युटी वर असतांना पोलीस शिपायाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.!
मीडिया वी.एन.आय :
कियार ते आलापल्ली रस्त्यावरील रोड ओपनिंग अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी ते आपल्या पथकासोबत रवाना झाले होते. यादरम्यान पोलीस स्टेशन कोठीपासून ५ किलोमीटर चालल्यानंतर, त्यांनी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली असता त्यांना तात्काळ भामरागड येथील ग्रामीण आरोग्य केंद्र/आरएचसी येथे हलवण्यात आले होते, मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले होते.
त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे प्राथमिक मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. आज रोजी त्यांचा अंत्यविधी गडचिरोली येथिल कठाणी नदी घाटावर होणार आहे.त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी,आई, वडील, ३ वर्षीय मुलगी आहे.त्याचे वडील नगर परिषद गडचिरोली येथे कार्यरत आहेत.
मंगळवारी (ता.११) भामरागड तालुक्यातील दिरंगी-फुलणार जंगलात नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत महेश नागुलवार हा जवान शहीद झाला. ही घटना ताजी असतानाच रवीश मधुमटके या जवानाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Gadchiroli: A police constable died of a heart attack while on duty.
#गडचिरोली #Gadchiroli #MediaVNI #Maharashtra #police #gadchirolipolice