गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) अंतिम टप्पात; 19 मार्चला गायक सोनू निगम यांचा कार्यक्रम.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) अंतिम टप्पात; 19 मार्चला गायक सोनू निगम यांचा कार्यक्रम.!

दि. 16 मार्च 2025 
MEDIA VNI 
गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) अंतिम टप्पात; 19 मार्चला गायक सोनू निगम यांचा कार्यक्रम.! 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या वतीने आयोजित गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) यंदा प्रचंड उत्साहात रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या क्रीडा रसिकांचे लक्ष लागून राहिलेल्या या स्पर्धेतील सेमीफाइनल आणि अंतिम सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

पहिला सेमीफाइनल सामना:
१६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता गडचिरोली हरिकेन्स विरुद्ध आहेरी सुपर किंग्स यांच्यात होईल तर

दुसरा सेमी फायनल सामना:१७ मार्च २०२५ ला सायंकाळी ७ वाजता गडचिरोली पोलीस कमांडो वॉरियर्स विरुद्ध चामोर्शी ईगल्स यांच्यात होणार आहे.

वरील दोन सेमी फायनल सामन्यातून विजेते होणारे संघ यांच्यात महाअंतिम सामना:
१९ मार्च २०२५ ला संध्याकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत होईल.
अंतिम सामन्यानंतर, संध्याकाळी ७ वाजता विजेत्यांचा प्रेझेंटेशन समारंभ आणि त्यानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या स्वरांनी नटलेला संगीतमय कार्यक्रम होणार आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या क्रीडाप्रेमींनी आणि कुटुंबासह उपस्थित राहून आपल्या आवडत्या संघाला प्रोत्साहन द्यावे आणि या शानदार सोहळ्याचा आनंद लुटावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Gadchiroli District Premier League (GDPL) — Into the final stages!
#गडचिरोली #Gadchiroli #MediaVNI #Maharashtra #sports #cricket 
Gadchiroli District Premier League (GDPL) in the final stage; Singer Sonu Nigam's program on March 19!

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->