काटली ग्रामपंचायत मध्ये प्रचंड भ्रष्टाचार; ग्रामसेवकाला ताबडतोब निलंबित करा- आजाद समाज पार्टीचीं मागणी. - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

काटली ग्रामपंचायत मध्ये प्रचंड भ्रष्टाचार; ग्रामसेवकाला ताबडतोब निलंबित करा- आजाद समाज पार्टीचीं मागणी.

दि. 20 मार्च 2025 
MEDIA VNI 
काटली ग्रामपंचायत मध्ये प्रचंड भ्रष्टाचार; ग्रामसेवकाला ताबडतोब निलंबित करा- आजाद समाज पार्टीचीं मागणी.
- माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ.! 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : काटली येथील ग्रामसेवक शरद येल्टिवार यांनी ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोळ केल्याचा आरोप आजाद समाज पक्षाने पत्रकार परिषद घेत केला आहे. त्यामुळे ग्रामसेवक शरद येल्टीवार यांना ताबडतोब निलंबित करण्याची मागणी पक्षाने केली आहे. सोबतच विस्तार अधिकारी पाल यांचेकडे वारंवार तक्रार करून त्यांनी सतत या बाबी कडे दुर्लक्ष करत ग्रामसेवकाची पाठराखण केल्याचा आरोप सुद्धा पाल यांचेवर केला आहे.
माहितीच्या अधिकारा अंतर्गत "मासिक सभेचे ठराव व संपुर्ण कॅशबुक च्या 2021 पासून च्या सत्यप्रती अहवाल" ही माहिती प्रथमदा 30/10/2023 रोजी आजाद समाज पक्षाचे कार्यकर्ते प्रकाश डोईजड यांनी मागितलेली होती परंतु अर्जाची प्रत हरविल्याचा कारण दाखवून 24/01/2023 रोजी तत्कालीन विस्तार अधिकारी भोयर यांनी OC मागितली. पण काहीच दिवसात भोयर यांचा मृत्यू झाल्याने विस्तार अधिकारी चार्ज मा. पाल यांचेकडे आला असता त्यांनी सुद्धा माझा याच्याशी संबंध नाही, मी त्यावेळी नव्हतो म्हणून माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे प्रकाश डोईजड यांनी पुन्हा 19/08/2024 रोजी माहितीच्या अधिकारात तीच माहिती मागविली. परंतु ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार असल्यामुळे ग्रामसेवकाने पुन्हा माहिती देण्यास टाळाटाळ केली असा आमचा आरोप आहे. त्यामुळे विस्तार अधिकारी पाल यांचेकडे त्याबाबत तक्रार करण्यात आली परंतु ग्रामसेवक शरद येल्टीवार व विस्तार अधिकारी पाल यांनी साठेगोठे असल्याने काहीतरी नियमबाह्य कारणे दाखवत माहिती दिली नाही व प्रकरण लांबवत गेले. विशेष म्हणजे माहिती घेण्यासाठी लागणारी रुपये 1176/- रक्कम (पावती) सुद्धा 14/10/2024 ला भरण्यात आली होती. तथापी ग्रामसेवकानी माहिती दिली नाही.

याची तक्रार मी स्वतः राज बन्सोड व अर्जदार प्रकाश डोईजड, ग्रामपंचायत सदस्य देवा भोयर यांनी पूर्वीचे गट विकास अधिकारी गोंगले यांचेकडे केली परंतु त्यांनी योग्य ती कारवाई केली नाही व अशात अविनाश पाटील हे गट विकास अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर आम्ही त्यांचेकडे तक्रार टाकली असता त्यांनी 20/02/2025 रोजी सुनावणी लावून विस्तार अधिकारी व ग्रामसेवक दोघांनाही माहिती देण्याचे आदेश दिले. त्यानुसार विस्तार अधिकारी यांनी 06 मार्च 2025 ला आम्हाला कार्यालयात बोलवून माहितीचे अवलोकन करुन नेमकी कोणती माहिती पाहिजे याची नोंद करायला सांगितल. त्यानुसार आम्ही नोंद करुन दिली असता केवळ मासिक सभेचे ठराव देण्यात आले परंतु कॅशबुक चीं माहिती दिली नाही. ती सोमवार ला देतो असे बोलले. परंतु त्यादिवशी ग्रामसेवक xerox नाही झाल्याचे कारण दाखवून माहिती दिली नाही. विस्तार अधिकाऱ्याशी बोललो असता त्यांनीही पाहिजे तसा सहकार्य केला नाही. याचा अर्थ दोघांचीही मिली भगत असल्याचा आमचा आरोप आहे.

मासिक सभेचे केवळ 10 सभेचे ठरवांचा अभ्यास केला असता खालीलप्रमाणे पैशाची अफरातफर झाली व ग्रामसेवका ने केलेला मोठा घोटाळा निदर्शनास आला आहे.
आपण शहनिशा करावी.

2021 ला सत्ता बसल्यानंतर 4 थी व 5 वी मासिक सभेतील घोळ

• ग्रामनिधी 
220476 शिल्लक असताना 5 व्या सभेत 76155 दाखविली.
जमा 3050 सह एकूण 79205
घोळ 141271 रुपये.

• शासकीय निधी 
241838/- अनुदान व 
46032/- जुनी शिल्लक 
Cc रोड वर 241838 खर्च झाल अस त्यांच म्हणणं आहे पण तो झालाच नाही. अस मोका चौकशीत माहिती प्राप्त झाली. रोड 2024 मध्ये झाला.

• संपुर्ण स्वच्छता कार्यक्रम 
4 थ्या सभेत 250764/- शिल्लक होती. 5 व्या सभेत जमाखर्च nil आहे. पण शिल्लक केवळ 96215/- कशी....
घोळ 154549/-

• दलित वस्ती सुधार योजना 
चौथ्या सभेत 161524/- आहे तर 5 व्या मध्ये तेवढी पाहिजे पण दाखविली आहे 70648/-..
घोळ - 90876/-

• ई टेंडर 
जुनी 34517/- जमा खर्च बिल असताना 5 व्या सभेत ठरावात निल आहे. 
घोळ 34517/-



• चौदावा वित्त आयोग..
6 व 7 व्या मासिक सभेत 150000/- शिल्लक असताना व जमाखर्च निल असताना 8 व 9 व्या सभेत शिल्लक रक्कम शून्य आहे. Record उपलब्ध नाही. 

• 15 व्या वित्त आयोग 

4 थ्या सभेत 423969/- शिल्लक आहेत. पण 5 व्या सभेत 101154 इतकेच आहेत. 6-7 मासिक सभेत तेवढीच रक्कम दाखवत असून 322815/- घोळ दाखवते. व 8 व्या सभेत सर्व Nil दाखवून पुन्हा 9 व्या सभेत 1258991/- रुपये रक्कम शिल्लक कस!

• पाणी निधी 
चौथ्या सभेत शिल्लक 75070/- असताना 5 व्या सभेत 3155/- दाखविले आहे. जमा 1200 पकडून 4355/- शिल्लक आहे.
घोळ 75715/- 
तसेच 7 व्या सभेत 6755/- असताना 8 व्या सभेत record दाखवीत नाही.

सदर घोळ केवळ 10 मासिक सभेतील असून 2025 पर्यंत झालेल्या एकूण महासभेत किती घोटाळा असेल याची कल्पना आपण करु शकता.
त्यामुळे अशा ग्रामसेवकाला ताबडतोब निलंबित करण्यात यावे. अन्यथा आपल्या कार्यालया समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा आजाद समाज पार्टी व ग्रामसदस्य यांच्या वतीने देत आहोत.


सदर माहिती आजाद समाज पार्टी गडचिरोलीच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी धर्मानंद मेश्राम, प्रदेश सचिव पूर्व विदर्भ, राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष, आजाद समाज पार्टी गडचिरोली. प्रकाश डोईजड , कार्यकर्ता तथा काटली ग्रामस्थ, देवा भोयर , ग्रामपंचायत सदस्य काटली. 
रेवनाथ मेश्राम, माजी ग्रामपंचायत सदस्य काटली. 
भास्कर कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य काटली.
सतीश दुर्गमवार, मीडिया प्रभारी ASP. आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Massive corruption in Katli Gram Panchayat; Suspend Gram Sevak immediately - Azad Samaj Party demands.
- Refrain from providing information sought under Right to Information.!

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->