- ५ तारखेला सुरु होण्याची शक्यता कमी; नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता !
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली / देसाईगंज : शहरातील रेल्वे लाईनच्या बोगद्याने रहदारीची मोठी समस्या निर्माण केली होती. पावसाळ्यातच नव्हे तर हिवाळ्यातही या बोगद्यातून आवागमन करतांना नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच रहदारी करावी लागत होती, नगर पालिका प्रशासनाने व लोकप्रतिनिधीनी या बाबीकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधल्याने प्रशासनाने पाणि निस्सारणाचे काम दि. 20 मार्च 2024 पासून सुरु केले. सदरचे काम 5 एप्रिल पर्यंत सुरू रहाणार असल्याची सुचना रेल्वे विभागामार्फत न.प.चे मुख्याधिकारी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केले होते. मात्र नागरिकांनी सहकार्य करून सुद्धा नागरिकांसाठी दुरुस्ती होत असलेला बोगदा दुरुस्तीच्या नावाखाली पूर्णत ओबळधोबळ होत असून दर्जाहीन असल्याचे प्रत्यक्ष पाहणीदरम्यान समजते.
देसाईगंज शहर रेल्वे लाईन मुळे दोन भागात विभागलेले असुन रहदारीसाठी तयार करण्यात आलेल्या बोगद्यामुळे पावसाळ्यात रहदारिची मोठी समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांना बोगद्यात साचलेल्या घाण पाण्यातुन आवागमन करावे लागत होते. ही समस्या पावसाळ्या पुरती नव्हे तर हिवाळ्यातही उद्भवत असल्याने देसाईगंज प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनीही रेल्वे प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार, प्रत्यक्ष वस्तुस्थिती दर्शवून समस्येचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली, त्यानुसार रेल्वे प्रशासनाने साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठी पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु केले. बोगद्यातील पाणी निचरा होण्यासाठी पुर्वीपेक्षा भले मोठे पाईप टाकण्यात आलेले आहे. यामुळे साचलेले पाणी क्षणात बोगद्याबाहेर जाईल. परंतु बोगद्यात नव्याने पाण्याची लेवल मिळविण्याकतीला कॉंक्रीट करण्यात आले. ते कॉन्क्रेट पूर्णत ओबळ ढोबळ असून बोगदा सुरू झाल्यानंतर वाहत चालकांना मोठा त्रास सहन करीत बोगदा पार करावा लागेल. वास्तविक नव्याने कॉन्क्रेट टाकतांना एक लेवल प्लेन मध्ये यायला हवे होते. परंतु तसे न करता कंत्राटदाराने त्या कामाला खराब करून टाकले. याबाबत दि. २ एप्रिलला आमदार रामदास मराराम यांनी बोगद्याचे काम सुरु असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांनी होत असलेल्या गैरसोयीच्या मार्गाची पाहणी केली. यात मोठी अनियमीतता दिसून आल्याने आमदार मराराम यांनी संबंधितांनी कामात दुरुस्तीचे आदेश दिले.
यावेळी तहसिलदार प्रिती डूडूलकर न.प.चे कनिष्ठ अभियंता नंदनवार, कंत्राटदाराचे सुपरवाईजर कनिष्ठ अभियंता, आरोग्य विभाग प्रमुख गेडाम, रेल्वे सल्लागार समिती सदस्य भास्कर डांगे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जिवन पा.नाट, सागर वाढई, युवक काँग्रेस अध्यक्ष अमर भरे, जावेद शेख, कमलेश बारस्कर, जितू चौधरी, धर्मेंद्र लांडे, पिलारे व कार्यकर्ते उपस्थित होते.
येत्या ५ तारखेपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेला बोगदा सुरू होणार की नाही यावर प्रश्ननिर्माण होत आहे.
Railway tunnel work substandard; MLA Ramdas Masram inspected it in person.!
- Less likely to start on the 5th; Possibility of inconvenience to citizens!
#wadsa #Railway #gadchiroli #MediaVNI