दि. 19 एप्रिल 2025
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आमदार रामदास मसराम यांची आढावा बैठक.!मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली/कोरची : सध्या विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात वाढत्या उन्हाळ्यामुळे पाणीटंचाईचे संकट उभे राहत आहे. या पार्श्वभूमीवर कोरची तालुक्यातील पाणीटंचाईची गंभीर दखल घेत आमदार रामदास मसराम यांनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली.
या बैठकीत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच तथा ग्रामसेवक उपस्थित होते. तसेच तहसीलदार प्रशांत गड्डम, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश फाये, तालुका काँग्रेस अध्यक्ष मनोज अग्रवाल ,नगराध्यक्ष हर्षलताताई भैसारे,माजी जि.प.सदस्य रामसुराम काटेंगे,राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष प्रतापसिंग गजभिये यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता गेडाम, सिंचाई विभागाचे उपकार्यकारी अभियंता मरसकोल्हे, विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता वांढरे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष धनिराम हिडामी, माजी सरपंच तुलाराम मडावी, जीवन नुरुटी, जगदीश काटेंगे, दानशूर हलामी, मोहन कुरचाम, दामेसाय कोवाची यांची देखील उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान विविध गावांतील जलस्त्रोत, बंद पडलेली विहिरी, बिघडलेले बोरवेल्स, टँकरने पाणीपुरवठा, तसेच शासनाच्या जलसंधारण योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार मसराम यांनी प्रशासनाला निर्देश दिले की, एकाही गावात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना होऊ नये याची विशेष खबरदारी घेण्यात यावी.
यावेळी काही ग्रामपंचायत प्रतिनिधींनी आपल्या गावातील समस्या मांडल्या असता, आमदारांनी त्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
बैठकीचा उद्देश केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्याचा होता, असे आमदार मसराम यांनी सांगितले.
विद्युत विभागाच्या ढिसाळ कारभारावर आमदारांनी व्यक्त केली नाराजी.
मागील काही दिवसांपासून कोरची तालुक्यातील नागरिक विद्युत पुरवठाच्या अनियमतमुळे त्रस्त झाले असून शेतकऱ्यांच्या पिकाला सुद्धा याचा फटका बसत असून सतत विजपुरवठा खंडित व कमी दाबाच्या विद्युत सेवेमुळे पीक करपत आहेत त्यामुळे तातडीने उपाययोजना करून कोरची तालुक्यात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा असे आदेश उपकार्यकारी अभियंता सुमीत वांढरे यांना दिली व विद्युत विभागाच्या ढिसाळ कारभारावर आमदारांनी नाराजी व्यक्त केली.
Review meeting of MLA Ramdas Masram to overcome water shortage.
#Gadchiroli