दि. 04 मे 2025
बारावीचा निकाल उद्या ५ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार; मोबाईलवर सर्वात आधी 'असे' पाहा गुण..Maharashtra Board 12th Results 2025:
मीडिया वी.एन.आय :
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या इ. १२ वीच्या परीक्षेचा निकाल ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता जाहीर करणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. यावेळी बोर्डाने नेमकं काय सांगितलं हे पाहूया..
बोर्डाने काय सांगितलं?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील.
मोबाईलवर सर्वात आधी 'असे' पाहा गुण
उद्या म्हणजेच ५ (मे) तारखेला जेव्हा निकाल खरोखरीच जाहीर होईल तेव्हा साहजिकच एकाच वेळी साईटवर लोड आल्याने क्रॅश होण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही आपल्या मोबाईल फोनवर सगळ्यात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करू शकता.
महाराष्ट्र बोर्ड 12 वी निकाल 2025 : निकाल साईटवर कसा तपासायचा?
अधिकृत वेबसाइटला mahresult.nic.in वर भेट द्या.
मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र SSC, HSC निकाल 2025 लिंक तपासा.
लॉग इन तपशील ऍड करून सबमिट वर क्लिक करा.
एंटर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा.
निकाल डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.
महाराष्ट्र बोर्ड12 वी निकाल 2025: मोबाईलवर SMS मध्ये कसा समजेल निकाल?
नवा एसएमएस या फॉरमॅटमध्ये तयार करा: MHHSCSEAT नं.
57766 वर एसएमएस पाठवा.
महाराष्ट्राचा HSC/12वीचा निकाल त्याच क्रमांकावर पाठवला जाईल.
12th result will be announced tomorrow on May 5 at 1 pm; First look at 'Asi' on mobile.
#hscresult #HSC #result #Maharashtra #MediaVNI